माझ्या आयुष्याला योग्य वळण देणाऱ्या आईचे निधन, बच्चू कडू यांची ट्विटवरून शोकसंवेदना

राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक झालाय. इंदिराबाई कडू यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माझ्या आयुष्याला योग्य वळण देणाऱ्या आईचे निधन झाले. अशी माहिती बच्चू कडू यांनी ट्विटवरून दिली.

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणाऱ्या आईचे निधन, बच्चू कडू यांची ट्विटवरून शोकसंवेदना
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांची आई इंदिराबाई कडू यांचे निधन.
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 3:43 PM

अकोला : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू ( Indirabai Babarao Kadu) यांचे आज सकाळी दहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. इंदिराबाई या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा (Belora in Chandurbazar taluka) येथील राहत्या घरी इंदिराबाईंनी अखेरचा श्वास घेतला. दुखःद बातमी मिळताच बच्चू कडू अमरावतीवरून गावाला गेले. बच्चू कडू यांनी ही दुखत बातमी आपल्या ट्विट अकाउंटवरून शेअर केली. सोबत आईसोबतचा फोटोही टाकला.

माझ्या आयुष्याला दिले योग्य वळण

माझ्या आयुष्याला वळण देणारी माझी आई मला सोडून गेल्याचं बच्चू कडू यांनी ट्विटवर सांगितलं. दुपारी पावणेदोन वाजता त्यांनी हे ट्विट केलंय. त्यानंतर बेलोरा येथील राहत्या घरी सकाळी दहा वाजता इंदिराबाई यांचे निधन झाले.

बच्चू कडू यांचे टि्वट

खासदार अमोल कोल्हे यांची पोस्ट

खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबूकवर या निधनावर दुःख व्यक्त केले. ते म्हणतात, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना! कडू परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.

Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

भंडाऱ्यात काम न करताच पैशांची उचल, पांदण रस्ते गायब! महालगाव ग्रामपंचायतीचा गैरकारभार?