काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा, प्रणिती शिंदे म्हणतात भाजपनं घेतला…

| Updated on: Sep 22, 2022 | 10:02 PM

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोल्यात एक जाहीर सभा देखील होणार असल्याचही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा, प्रणिती शिंदे म्हणतात भाजपनं घेतला...
Follow us on

गणेश सोनोने, अकोला : कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच सर्व तळा गाळातील शेवटच्या घटकातील जाती धर्माला जोडण्याचे काम केले आहे. मात्र भाजप ते तोडण्याचे काम करत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसतर्फे भारत जोडो पदयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा भाजपाने चांगलाच धसका घेतला असल्याचा टोला काँग्रेस (आय)च्या प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी लगावला.

प्रणिती शिंदे अकोल्यातील स्वराजभवन येथे भारत जोडो पदयात्रेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या पदयात्रेचे आयोजन अकोला जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्यात केले आहे.

या पदयात्रेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत. राहुल गांधी हे मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये राहणार नाहीत. राहुल गांधी हे गरिबाच्या झोपडीत मुक्कामी राहणार असल्याचं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

कॉंग्रेसने देशासाठी दिलेलं बलिदान विसरून चालणार नाही. देशाला एकजूट ठेवण्याची जबाबदारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे. कुणी सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून उपयोग नाही. भाजप देश फोडायचे काम करत आहे.

देशाची एकात्मता आणि बहुमता एक ठेवू शकतो, ही आपली जबाबदारी आहे. भारताचे तुकडे करणाऱ्या भाजपाला आता दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोल्यात एक जाहीर सभा देखील होणार असल्याचही प्रणिती शिंदे म्हणाल्या.