लातूर जिल्हा बँकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनेलचा विजयी चौकार, भाजपच्या पॅनेलचं काय झालं?

| Updated on: Oct 22, 2021 | 11:34 AM

राज्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं वारं सुरु आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसतंय. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक देखील जाहीर झाली असून इथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनेलला भाजपनं आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय.

लातूर जिल्हा बँकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनेलचा विजयी चौकार, भाजपच्या पॅनेलचं काय झालं?
लातूर जिल्हा बँक निवडणूक
Follow us on

लातूर: राज्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं वारं सुरु आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसतंय. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक देखील जाहीर झाली असून इथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनेलला भाजपनं आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनेलनं बिनविरोध विजयाचा चौकार लगावला आहे.

सहकार पॅनेलनं चौकार लगावला

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, उर्वरित 15 जागांसाठी काँग्रेसचेच 31 अर्ज शिल्लक राहिले आहेत . अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी आहे. 19 संचालक निवडून देण्यासाठीची निवडणूक लागली आहे.

भाजपचे पॅनेल उभे करण्याचे प्रयत्न अयशस्वी

विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाप्रणित पॅनेल उभे करण्यात आले होते. मात्र, अर्ज छाननीत या पॅनेलचा एकही अर्ज वैध ठरला नाही. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक जिंकल्याचा फक्त सोपस्कार उरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील ,काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख , जळकोटचे मारोती पांडे , चाकूरचे नागनाथ पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

दिलीपराव देशमुखांच्या नेत्तृत्वात पॅनेल

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यांनी आता आमदार धीरज देशमुख यांना बँकेच्या निवडणुकीत उतरवले आहे. भाजपनं पॅनेल उभं करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही.

इतर बातम्या:

PM Modi : 100 कोटी लसीकरण हे प्रत्येक भारतीयाचं यश, मेड इन इंडियाला लोक चळवळ करा, मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

T20 World Cup 2021 : ‘बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी बच्चा’, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूची कबुली

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन

Congress NCP Panel won four seats unopposed in Latur District co operative bank ltd election