AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 : ‘बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी बच्चा’, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूची कबुली

टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे.

T20 World Cup 2021 : 'बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी बच्चा', पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूची कबुली
Jasprit Bumrah - Shaheen Shah Afridi
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 22, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडी समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंची आणि संघाची तुलना करत आहेत. अशीच तुलना भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी या दोघांमध्ये केली जात आहे. परंतु बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना करणाऱ्यांना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. (T20 World Cup 2021: Shaheen Afridi is a child in front of Bumrah! says Mohammad Amir)

पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा खेळाडू मोहम्मद अमीर याने बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे, अमीर म्हणाला की, “ती व्यक्ती मूर्ख असेल जी शाहीन आफ्रिदीची तुलना जसप्रीत बुमराहशी करेल. बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी अजून बच्चा आहे.”

डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा नायक होता. अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि, आता तो टी -20 जगताबद्दल मोठी वक्तव्ये करताना दिसत आहे. यूएईमध्येच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याला बुमराह आणि शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने जे मत व्यक्त केलं ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लोकांचे डोळे आणि कान उघडणारं होतं.

बुमराहसोबत शाहीनची तुलना करणं मुर्खपणा ठरेल : आमीर

मोहम्मद आमीर म्हणाला, “शाहीन आफ्रिदीची सध्या बुमराहशी बरोबरी करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण, शाहीन अजून यंग आहे आणि शिकत आहे. दुसरीकडे, बुमराह बराच काळ टीम इंडियाकडून खेळत आहे. माझ्या मते, तो सध्या टी -20 मध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचा सामना करणे अवघड आहे. पण शाहीन सध्या पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.” आमिर म्हणाला, “तरीही दोघांमध्ये चांगली लढत होईल. कारण बुमराह नवीन चेंडूने चांगली कामगिरी करतो आणि शाहीन सध्या नवीन चेंडूसह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.”

बुमराह VS शाहीन

बुमराह आणि शाहीनच्या टी-20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर दोघांमध्ये 20 सामन्यांचे अंतर आहे. बुमराहने आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 59 विकेट्स घेतल्या आहेत, तर शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 32 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला पाकिस्तानविरुद्ध टी -20 खेळण्याचा अनुभव आहे. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध खेळलेल्या 2 टी-20 मध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर शाहीन आफ्रिदीकडे भारताविरोधात खेळण्याचा अनुभव नाही.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

(T20 World Cup 2021: Shaheen Afridi is a child in front of Bumrah! says Mohammad Amir)

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित