सांगलीत मगरींकडून महापूराची पूर्वसूचना, नक्की काय घडलं होतं?

| Updated on: Aug 08, 2021 | 7:09 AM

Sangli Flood situation | यंदा मगरींनी आपली वीण उंचीवर घातली. आमणापूर येथील पीर परिसरात, काळ्या ओढ्याजवळ मगरीने विण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापूराचा संकेत दिला होता.

सांगलीत मगरींकडून महापूराची पूर्वसूचना, नक्की काय घडलं होतं?
सांगलीत महापूर
Follow us on

सांगली: गेल्या काही दिवसांमध्ये सांगलीत घराच्या छतावर आणि रस्त्यांवर मगरी फिरतानाचे चित्र दिसून आले होते. हे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले होते. 23 जुलैचा महापूर ओसरल्यानंतर अजस्र मगरी नदीकाठच्या गावांमध्ये फिरताना आढळून आल्या होत्या.

एखाद्या ठिकाणी खरोखरच मगरीने हल्ला केला असल्याचे समोर आले नाही. कारण प्रलयंकारी महापूराने सैरभैर झालेल्या मगरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावांमध्ये शिरल्या होत्या. मात्र, याच मगरींनी मे महिन्यातच महापूराचे संकेत दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

साधारण मे-जून हा मगरींसाठी वीणीचा हंगाम. या काळात ती नदीकाठी असणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा काढून आपली अंडी घालून पुरतात. त्यानंतर अंडी उबून आतून पिल्लं ओरडेपर्यंत थांबून मगर वाट बघते. पिल्लांचा आवाज आला की मगर जमिनीतील अंडी उकरून फोडून पिल्लांना बाहेर काढते.

यंदा मगरींनी आपली वीण उंचीवर घातली. आमणापूर येथील पीर परिसरात, काळ्या ओढ्याजवळ मगरीने विण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापूराचा संकेत दिला होता. मात्र, संकेताकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी सांगितले. कोणताही वन्यजीव हा विणीच्या काळातच अधिक आक्रमक असतो. तसेच मगरी एप्रिल ते जून दरम्यान आक्रमक असतात. इतरवेळी ती तिच्या अधिवासात सुस्त असते. मात्र माध्यमांनी निर्माण केलेल्या संघर्षामुळे आपण तिच्या संकेताकडे दुर्लक्ष केल्याचे संदीप नाझरे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

सांगलीसह 5 गावाची डोकेदुखी वाढली, महापूर नाही, तर ‘या’ कारणाने धोका वाढला

Video | वारणेकाठी आढळली तब्बल 12 फुटांची अजस्त्र मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Sangli Flood Marriage | सांगलीच्या पुरात, भावाने काढली वरात, छातीभर पाण्यातून नवरीला नेलं