नारायण राणेंचं मंत्रिपद मोठं त्यांनी कोकणचा कायापालट करावा, कट्टर विरोधक केसरकरांची अपेक्षा

| Updated on: Oct 25, 2021 | 1:40 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेले मंत्रिपद हे केंद्रातील मोठं मंत्रिपद आहे. त्याचा उपयोग त्यांनी कोकणसाठी आणि कोकणी जनतेसाठी करावा, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

नारायण राणेंचं मंत्रिपद मोठं त्यांनी कोकणचा कायापालट करावा, कट्टर विरोधक केसरकरांची अपेक्षा
नारायण राणे दीपक केसरकर
Follow us on

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेले मंत्रिपद हे केंद्रातील मोठं मंत्रिपद आहे. त्याचा उपयोग त्यांनी कोकणसाठी आणि कोकणी जनतेसाठी करावा. हे पद जर मला मिळालं असतं तर आपण कोकणचा कायापालट केला असता, असं नारायण राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.

कोकणाचा कायापालट करणं राणेंच्या हातात

नारायण राणेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जे मंत्रिपद मिळवलं आहे. त्याच्या माध्यमातून कोकणचा काया पालट करावा ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर विकास केला तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक करू, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

देशातून ड्रग्ज हद्दपार व्हावं ही सेनेची भूमिका

50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयच. ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात वरून येणाऱ्या ड्रग्स रॅकेट आधी उध्वस्त करा, असं दीपक केसरकर म्हणाले.

एका अधिकाऱ्यावरुन सेनेवर प्रश्नचिन्ह नको

एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची भूमिका मराठी माणसाविरोधात आहे, अशी कोणी टीका करू नये. आम्हाला त्या मराठी अधिका-याबद्दल आदर आहे. त्या अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पार पाडावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, उगाचच एका व्यक्ती वरून शिवसेनेच्या मराठी भूमिका विषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा सणसणीत टोला माजी गृह राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला आहे.

इतर बातम्या:

Narayan Rane | मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका

संजय राऊतांचा आधी अमित शहांना खोचक सल्ला, आता राणे म्हणतात तुम्ही काश्मीरला जाऊन तरी दाखवा

 

Deepak Kesarkar said Narayan Rane should work for development of Kokan and also comment on drugs case