मी पुन्हा येईल म्हटल्यावर येतोच, कसा येतो हे… देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी

| Updated on: May 05, 2023 | 9:14 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या कर्नाटक सीमाभागाच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते कर्नाटकात आलेले आहेत.

मी पुन्हा येईल म्हटल्यावर येतोच, कसा येतो हे... देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : मी पुन्हा येईन… पुन्हा येईन… अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. त्यामुळे सत्तेत पुन्हा येण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न भंगलं. फडणवीस यांचं स्वप्न भंगल्यानंतर विरोधकांनी त्यांना मी पुन्हा येईन…च्या घोषणेवरून डिवचण्यास सुरुवात केली होती. त्यावर फडणवीस सातत्याने मौन धारण करून होते. मात्र, अडीच वर्षातच राज्यातील समीकरणे बदलली आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मी पुन्हा येईन… या घोषणेची आठवण करून देत विरोधकांना डिवचण्यास सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस काल कोल्हापुरात सीमाभागात होते. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी करताच एकच खसखस पिकली. आपलं कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील निट्टूर गावात विधान केलं आहे. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांची नरसिंह मंदिराला अचानक भेट देवून देवाचं दर्शनही घेतलं.

हे सुद्धा वाचा

तर काँग्रेसला त्यांची जागा दाखवू

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीसाठी जाहीरनामा जारी केला आहे. त्यात बजरंग दलावर बंदी आणणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवर टीका केली आहे. बजरंग दलावर बंदी आणणं कोण सहन करेल? बजरंग दलाने असं कोणतं देशविरोधी कार्य केलं आहे? एक तरी सांगा? असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

बजरंग दलावर बंदी घालणे म्हणजे देशभक्तांवर बंदी घालणं आहे. याचा अर्थ तुम्ही देशद्रोह्यांना साथ देत आहात. हे काँग्रेसने यापूर्वीही केलं आहे. भारताचे तुकडे पन्नास हजार होतील, असं म्हणणाऱ्यांसोबत राहुल गांधी असतात. त्यामुळे बजरंग दलावर बंदी घालू असं तुम्ही म्हणत आहात. बजरंग दलावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व हनुमानभक्त काँग्रेसला त्यांची जागा दाखवू, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.

मोदींमुळेच विकास शक्य

कर्नाटकात आज अनेक विकास कामे झाली आहेत. मात्र एक पैशाची दलाली कोणाला द्यावी लागली नाही. लॉकडाउनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठीशी उभे राहिले. मागच्या वेळी भाजपला थोड्या जागा कमी पडल्या तर बाकीच्यांची सर्कस सुरू झाली. विकासाची गाडी फक्त मोदींसोबतच पुढे जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.