भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान चक्क कालबाह्य औषधांचे वितरण, आसगाव येथील धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 04, 2021 | 10:07 PM

आसगाव येथे रविवारी एका खाजगी संस्थेद्वारे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात निःशुल्क रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान चक्क कालबाह्य औषधांचे वितरण, आसगाव येथील धक्कादायक प्रकार
भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान चक्क कालबाह्य औषधांचे वितरण
Follow us on

भंडारा : निःशुल्क असलेल्या आरोग्य शिबिरात जात असाल तर सावधान! आरोग्य शिबीरात जाणे तुम्हाला पडू शकतोय महागात… आरोग्याचं शिबिरच बेतू शकतंय जीवावर… भंडारा जिल्ह्यात आयोजित एका खाजगी आरोग्य शिबिरादरम्यान चक्क कालबाह्य औषधांचे वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगावमध्ये संबंधित प्रकार घडला आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Distribution of chucky expired medicines during the health camp at the store)

खाजगी संस्थेद्वारे आरोग्य शिबीराचे आयोजन

आसगाव येथे रविवारी एका खाजगी संस्थेद्वारे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात निःशुल्क रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत रितसर दवंडीही गावात पिटवण्यात आली होती. निःशुल्क असल्याने गावातील लोकांनी ह्या शिबिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली. दरम्यान या शिबिरामध्ये अनेक रुग्णांच्या डोळ्याची तपासणी व शस्त्रक्रिया झालेल्या ड्रॉपचे वितरण करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्ट रोजी हे औषध कालबाह्य असल्याचे काही लोकांना दिसले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच गावातील एका सूज्ञ युवकाने याची तक्रार ट्विटरद्वारे थेट पंतप्रधानांसह, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्भव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

50 लोकांना दिले कालबाह्य औषध

ही बातमी वाऱ्यासारखी गावात पोहताच प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच गर्दी करीत लोकांनी संताप व्यक्त केला. गावातील तब्बल 50 लोकांना कालबाह्य औषध दिल्याची प्राथमिक माहिती आहे. डोळ्या हा शरीराचा अत्यंत नाजूक भाग असून सुद्धा इतकी अक्षम्य चूक होते कशी असा संतप्त सवाल गावकरी विचारत असून अशा खाजगी शिबिर आयोजकांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

संबंधित संस्थेवर कारवाईची मागणी

हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव यांनी आयोजन केले नसल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला असून ग्रामपंचायतद्वारे एका खाजगी संस्थेने हे शिबिर घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर आरोग्य शिबिराने गावातील लोकांच्या आरोग्याची तपासणी निःशुल्क होत असल्याने परवानगी दिल्याचे ग्रामपंचायतीद्वारे खुलासा करण्यात असून अशा संस्थेवर कारवाईची मागणी आता ग्रामपंचायतीकडून केली जात आहे.

एकंदरीत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात गैर नाही. मात्र आपण देत असलेले औषध तपासून देणेही गरजेचे आहे. केवळ थातूर मातूर शिबिर आयोजन करणे कोणाच्या जीवावर बेतू शकते हे निश्चित. आज कालबाह्य औषधाचा वापर ह्या गावातील अनेक लोकांनी केला आहे. त्यामुळे ह्या गावातील लोकांची पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे. तर यांची तक्रार आता थेट देशासह राज्यातील मोठ्या मंत्र्यांकडे गेल्याने आता ह्या प्रकरणात काय घडामोडी होतात हे बघणे महत्वाचे आहे. (Distribution of chucky expired medicines during the health camp at the store)

इतर बातम्या

नागपूरात ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉलची पेरणी, नरखेडमधील वन क्षेत्रात वृक्षारोपणाचा अत्याधुनिक प्रयोग

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’, मराठा आरक्षणावरुन प्रवीण दरेकरांची खोचक टीका