नागपूरात ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉलची पेरणी, नरखेडमधील वन क्षेत्रात वृक्षारोपणाचा अत्याधुनिक प्रयोग

वृक्ष रोपणाची गरज फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगात सुद्धा आहे. त्यामुळे ज्या जागेचा उपयोग होत नाही, ज्या ठिकाणी जाता येत नाही, ज्या ठिकाणी हा प्रयोग नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

नागपूरात ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉलची पेरणी, नरखेडमधील वन क्षेत्रात वृक्षारोपणाचा अत्याधुनिक प्रयोग
नागपूरात ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉलची पेरणी
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 9:28 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉल टाकण्याचा प्रयोग राबविला जात आहे. नरखेड तालुक्यातील वन क्षेत्रात ड्रोनच्या सहाय्याने वृक्षारोपणाचा अत्याधुनिक पायलॉट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. तसेच टाकलेली बियाणे उगवले की नाही, त्यांची वाढ कशी होत आहे यावरही ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करणे शक्य नाही त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवणे फायदेशीर ठरणार आहे. (Sowing of seed balls in a drone-assisted area in Nagpur)

प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला हा प्रयोग

राज्यातील अनेक भाग असे आहेत, ज्या ठिकाणी जागा तर आहे मात्र प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करता येत नाही. असेच काही भाग या पायलट प्रोजेक्टसाठी निवडण्यात आले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वन परिक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सीड बॉल टाकण्यात आले आहेत. यातून वृक्ष किती प्रमाणात उगवतील ते कसे वाढणार यावर सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. हा पायलेट प्रोजेक्ट असून त्याचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये करण्यात येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश सीमेवरील दुर्गम भागात 50 हेक्टरमध्ये 1 लाख 50 हजार सीड ड्रोनचं उपयोग करून टाकण्यात आले. झाडे लावण्याचा हा नवीन आणि अनोखा उपक्रम आहे. ही सीड बॉल हवेतून पडल्यानंतर किती झाड उगवली याच्यावर लक्ष वन कर्मचारी ठेवणार आहेत.

काय म्हणाले वन अधिकारी?

प्रति हेक्टर 30 हजार सीडबॉल प्रमाणे 50 हेक्टर परिसरात दीड लाख सीड बॉल टाकण्यात आलेले आहेत. जे सीड बॉल टाकण्यात आलेले आहेत. त्याचे प्रत्येक आठवड्याला निरीक्षण केले जाईल. किती सीड बॉल उगवले, रोपांची वाढ कशी होतेय या सर्वांचे निरीक्षण नोंदवले जाईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर शासन स्तरावर तो संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याच्या दृष्टीकोनातून शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

वृक्ष रोपणाची गरज फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगात सुद्धा आहे. त्यामुळे ज्या जागेचा उपयोग होत नाही, ज्या ठिकाणी जाता येत नाही, ज्या ठिकाणी हा प्रयोग नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. मात्र याला किती यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Sowing of seed balls in a drone-assisted area in Nagpur)

इतर बातम्या

Maratha Reservation : केंद्राकडून आरक्षणाचा अधिकार राज्यांना बहाल, खासदार संभाजीराजेंची भूमिका काय?

Maratha Reservation : 102 व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.