जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नोकरभरतीत घोटाळा? खडसे म्हणतात, प्रक्रिया ऑनलाईन!

| Updated on: Jun 11, 2021 | 9:49 AM

दूध संघाच्या संचालक मंडळाने कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे , असा आरोप जस्टीस फॉर पीपल्स संस्थेने (Justice For people) केला होता. संस्थेच्या या आरोपांना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी उत्तर दिलं आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नोकरभरतीत घोटाळा? खडसे म्हणतात, प्रक्रिया ऑनलाईन!
Eknath Khadse
Follow us on

जळगाव : दूध संघाच्या संचालक मंडळाने कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे , असा आरोप जस्टीस फॉर पीपल्स संस्थेने (Justice For people) केला होता. संस्थेच्या या आरोपांना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी उत्तर दिलं आहे. दूध उत्पादक संघाची भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत जस्टीस फॉर पीपल्स संस्थेचे आरोप खडसेंनी फेटाळून लावले. (Eknath Khadse Clarification on jalgaon milk Sangh recruitment)

जस्टीस फॉर पीपल्स संस्थेचा आरोप काय?

जळगाव दूध संघाच्या संचालक मंडळाने 163 जागांसाठी सुरू केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे , असा आरोप ‘जस्टीस फॉर पीपल्स’ संस्थेचे एन. जे. पाटील यांनी केला होता. तसंच ६३ कर्मचाऱ्यांच्या यादीसह त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या भरती प्रक्रियेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 63 जणांना नियमित केले जाणार असून त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी एन.जे. पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगावचे अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे तसेच भरती प्रक्रियेत आरक्षणाचे तत्व देखील पाळला जात नाही. त्यामुळे ही भरती त्वरित थांबवावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली .

संस्थेच्या आरोपाला खडसेंचं उत्तर काय?

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये अजून नोकरभरतीच झालेली नाही तर या प्रक्रियेत गैरव्यवहार कसा होणार?, असा प्रतिप्रश्न माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. असा कोणताही गैरव्यवहार झालेला नाही आणि होणार नाही, असं खडसे म्हणाले.

संस्थेच्या आरोपांचं खंडन करताना खडसे म्हणाले, “जळगाव जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली . त्यात 250 जागा भरण्यात आल्या. दूध उत्पादक संघाची भरतीदेखील त्याच धर्तीवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे . पैसे मागितल्यास पोलिसात जावे. दूध संघामध्ये गेल्या 5 ते 10 वर्षांपासून काम करीत आहेत, त्या कर्मचाऱ्यांनाया भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे”

(Eknath Khadse Clarification on jalgaon milk Sangh recruitment)

हे ही वाचा :

VIDEO: ‘गुप्ता, मला पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो, पोलीस मुख्यालयाचं काम छा-छू झालंय’

‘जवळचं’ आणि ‘लांबच’ दिसण्यासाठी ‘सेन्स’ असावा लागतो; एकनाथ खडसेंच्या मुलीचं सूचक ट्विट