‘जवळचं’ आणि ‘लांबच’ दिसण्यासाठी ‘सेन्स’ असावा लागतो; एकनाथ खडसेंच्या मुलीचं सूचक ट्विट

या फोटोसोबत रोहिणी खडसे यांनी लिहलेले कॅप्शन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. | Rohini Khadse NCP

'जवळचं' आणि 'लांबच' दिसण्यासाठी 'सेन्स' असावा लागतो; एकनाथ खडसेंच्या मुलीचं सूचक ट्विट
रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलेल्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विटवरवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांच्या हातात कॅमेरा दिसत आहे. (NCP leader Rohini Khadse twit start political speculations in Maharashtra)

या फोटोसोबत रोहिणी खडसे यांनी लिहलेले कॅप्शन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. कॅमेरा सोबत “लेन्स” आणि माणसाकडे “सेन्स” असणं खूप गरजेच असत. “जवळच” व “लांबच” नीट समजण्यासाठी !!, असे रोहिणी खडसे यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्या या कॅप्शनचा नेमका अर्थ काय यावरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले; जळगाव भाजपमधील पडझड थांबणार?


काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांच्यात फोनवरुन संवाद झाला होता.

या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीवेळी तिथे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे उदय सामंत यांनीही नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सगळ्यामागे काही राजकारण आहे का, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. अशातच आता रोहिणी खडसे यांच्या ट्विटने हे गूढ आणखीनच वाढवले आहे.

संबंधित बातम्या:

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; चंद्रकांत पाटलांचा टोला

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत; खडसेंची टीका

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

(NCP leader Rohini Khadse twit start political speculations in Maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI