Chandrapur Elephant | चंद्रपूरच्या ताडोबातील हत्ती निघाले गुजरातला; 4 नर आणि 2 मादी जामनगरच्या दिशेने

ताडोबात हत्तींना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित माहुत नव्हता. आवश्यक मनुष्यबळ नव्हते. त्यामुळं हत्ती येथे सुरक्षित नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून हत्तींना हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या हत्तींना ट्रकने रवाना करण्यात आल्याचं ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

Chandrapur Elephant | चंद्रपूरच्या ताडोबातील हत्ती निघाले गुजरातला; 4 नर आणि 2 मादी जामनगरच्या दिशेने
चंद्रपूरच्या ताडोबातील हत्ती निघाले गुजरातला
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 11:15 AM

चंद्रपूर : ताडोबातील सहा हत्ती अखेर गुजरातला हलवण्यात आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात बोटेझरी येथील कॅम्पमध्ये (Botezari Camp) हे हत्ती वास्तव्यास होते. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर- पातानील आणि चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Dark Tiger Project) वयोवृद्ध, अप्रशिक्षित हत्ती व पिलांना गुजरात राज्यातील जामनगरच्या राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टला सोपविण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानुसार काल ताडोबातील हे सहा हत्ती रवाना करण्यात आले. यात 4 नर आणि 2 मादीचा समावेश आहे. राधाकृष्ण टेम्पल ट्रस्ट (Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust) या सर्व हत्तींची कुठलाही खर्च न घेता आजन्म देखरेख करणार आहे. टेम्पल ट्रस्ट या सर्व हत्तींना यापुढे कुठलेही काम देणार नाही. त्यांचा धार्मिक वापर व प्रदर्शनासाठी वापर करणार नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

चांगली पिढी निर्माण व्हावी

दरम्यान हे सर्व हत्ती एकाच वंशावळीतील असल्याने त्यांची पुढील पिढी सदोष होण्याची शक्यता असल्याने हत्ती स्थलांतराचा मूळ प्रस्ताव देण्यात आला होता हे स्पष्ट झाले आहे. ताडोबात हत्तींना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित माहुत नव्हता. आवश्यक मनुष्यबळ नव्हते. त्यामुळं हत्ती येथे सुरक्षित नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून हत्तींना हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या हत्तींना ट्रकने रवाना करण्यात आल्याचं ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं.

कर्नाटकहून नवीन प्रशिक्षित हत्ती आणणार

ताडोबा येथे आता कर्नाटकमधून हत्ती येणार आहेत. ताडोबात हत्तींची गरज होती. नवीन येणारे हत्ती हे प्रशिक्षित राहणार आहेत. प्रशिक्षित मनुष्यबळ व माहुतदेखील राहणार आहे. नवीन हत्ती कर्नाटकमधून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं. ताडोबा जागतिक स्तरावर व्याघ्र प्रकल्प असल्यानं हत्तींची कमी लवकरच भरून काढण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.