Fathers Day : ना रक्ताचे नाते, ना गडगंज श्रीमंत, तरीही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारणारा ‘बाप माणूस’

| Updated on: Jun 20, 2021 | 6:53 AM

पांडुरंग यांनी जन्मताच अंध असलेल्या मुलाच्या जीवनात प्रकाश टाकून त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण केली आहे. (Fathers Day 2021 Washim Pandurang Uchitkar accepted the paternity of 15 blind children)

Fathers Day : ना रक्ताचे नाते, ना गडगंज श्रीमंत, तरीही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारणारा बाप माणूस
Pandurang Uchitkar
Follow us on

वाशिम : कोणतेही रक्ताचे नाते नसलेल्या एका व्यक्तीने चक्क 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारले आहे. पांडुरंग उचितकर असे या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे पांडुरंग यांना स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही त्या 15 अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी ते न डगमगता पार पाडत आहेत. (Fathers Day 2021 Washim Pandurang Uchitkar accepted the paternity of 15 blind children)

मनाशी ठाम निश्चिय करुन काही अंध विद्यार्थ्यांना आसरा

वाशिम तालुक्यात केकतउमरा नावाचे एक गाव आहे. या छोट्याशा गावात पांडुरंग उचितकर राहतात. पांडुरंग हे गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. मात्र अंध चेतन याची समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. यानंतर त्यांनी मनाशी ठाम निश्चिय करुन काही अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पाहता पाहता त्यांच्या झोपडीत 15 अंध मूल जमा झाली.

अनेकांकडून कार्याचे कौतुक

सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागले. मात्र आज हीच 15 मूल अंध असताना पांडुरंग यांचे आधार झाले आहेत. या सर्वांनी मिळून एक ऑर्केस्ट्रा काढला. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकतात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले. पण अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने ती देखील वेळ निघून गेली. यातील अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत.

Pandurang Uchitkar

अंध मुलांच्या जीवनात जगण्याची जिद्द निर्माण 

पांडुरंग यांनी जन्मताच अंध असलेल्या मुलाच्या जीवनात प्रकाश टाकून त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण केली आहे. जवळपास 15 अंध मुलांना सहाय्य करुन केले आहे. त्यांच्या पालन- पोषणसह संपूर्ण शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोन अंध जोडप्याचा विवाह देखील त्यांनी लावून दिला आहे.

अंधांसाठी संपूर्ण जीवन व्यतित करणारा बापमाणूस 

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो. पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही किंवा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून संपूर्ण जीवन त्यांच्यासाठी व्यतित करणारा हा बापमाणूस देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला हा फादर्स डे निमित्त ‘टीव्ही 9 मराठी’चा सलाम.

(Fathers Day 2021 Washim Pandurang Uchitkar accepted the paternity of 15 blind children)

संबंधित बातम्या :

Fathers Day : ‘फादर्स डे’ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा