Fathers Day : ‘फादर्स डे’ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा

एकीकडे वैद्यकीय खर्च भरमसाठ वाढत असल्याने बचत मोडावी लागते. त्यामुळे वडिलांच्या सुरक्षित भविष्याकरिता सर्वसमावेशक प्लान फायदेशीर ठरतो. (Buy Comprehensive Health Insurance for Your Father)

Fathers Day : 'फादर्स डे'ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा
Insurance
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 3:55 PM

dr shriraj Deshpande  डॉ. श्रीराज देशपांडे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, फ्युचर जनेराली इंडिया इन्शुरन्स

मुंबई : घरातील वडील घडाळ्याच्या काट्यावर धावपळ करून घरातल्यांची काळजी वाहत असतात. अनेकदा हे वडीलधारे स्वत:च्या तब्येतीची पर्वा मात्र करताना दिसत नाहीत. टाळेबंदीत कुटुंबियांसमवेत आपल्या नात्यांचा नव्याने वेध घेण्याची संधी मिळवून दिली. यंदा फादर्स डे’ला आगामी काळात वडिलांच्या देखभालीची काळजी तुम्ही घ्या. त्यांना एक भेट द्या. जेणेकरून त्यांना चिंतामुक्त जगण्याचा आनंद घेता येईल. एकीकडे वैद्यकीय खर्च भरमसाठ वाढत असल्याने बचत मोडावी लागते. त्यामुळे वडिलांच्या सुरक्षित भविष्याकरिता सर्वसमावेशक प्लान फायदेशीर ठरतो. (Father’s Day special 5 Reasons to Buy Comprehensive Health Insurance for Your Father)

हा सर्वसमावेशक आरोग्य विमा वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत विस्तारीत कवच आणि वित्तीय आधाराचे काम करतो. ही सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी सल्ला, वैद्यकीय चाचण्या आणि हॉस्पिटल भरतीच्या खर्चासोबत आउटपेशंट आणि इनपेशंट ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध करून देते.

?तुमच्या वडिलांना सर्वसमावेशक आरोग्य पॉलिसी भेट देण्यामागील 5 कारणे?

1. संरक्षित कवच (अंब्रेला कव्हर) प्रदान करते 

वयोमानाने विविध विकार होण्याची शक्यता असते. शून्य किंवा किमान सबलिमिट प्रक्रियांसह मोठी विमा रक्कम, शून्य सह-भरणा तुम्हाला विस्तृत संरक्षण बहाल करते. त्याशिवाय सध्या असलेल्या आणि यादीत नमूद आजार/प्रक्रियांकरिता कमी प्रतीक्षा कालावधीच्या योजना विमा फायदे मिळवून देतात. कमाल एकत्रित बोनसने कवच बऱ्याच पटीत वाढते. अशा योजनांमध्ये रुग्णाची घरीच देखभाल, आपतकालीन वैद्यकीय सुविधा इत्यादीचा समावेश असतो. ज्यामुळे तुम्हाला आपतकालीन मदत उपलब्ध होते.

2. सर्वसमावेशक आरोग्य पॉलिसीद्वारे विमा रक्कम रिलोड करण्याचा पर्याय उपलब्ध

वयोमानानुसार शरीर व्याधीग्रस्त होण्याची शक्यता असते. जर विम्याची रक्कम वर्षभरात वापरली तर सर्वसमावेशक विमा पॉलिसीत “रिलोड ऑफ सम इन्श्युरर्ड” तुम्हाला विम्याची रक्कम रिलोड करण्याची सूट मिळते. उदाहरणार्थ, जर तुमच्या वडिलांना वर्षात पहिल्यांदा रुग्णालयात भरती व्हावे लागले आणि रु 2 लाख किमतीच्या चालू विम्यावर रु 2 लाखांचा दावा करून झाल्यास, पुन्हा भरती करण्याची वेळ आली आणि रु 1 लाखांचे बिल आल्यास विमाधारकाला 2 लाख रक्कम रिचार्ज करून रु 1 लाखांचा भरणा करणे शक्य होते. तसेच आगामी काळात रिचार्ज केलेल्या विमा रकमेचा दावा करण्याची सुविधा मिळते.

3. नियमित वैद्यकीय तपासण्यांना कवच 

एखाद्या प्रसंगी वैद्यकीय आपतकालीन स्थिती ओढवल्यास योग्य वेळेवर चाचण्या करणे आवश्यक ठरते. तुमच्या वडिलांच्या आरोग्य स्थितीवर देखरेख राहण्याच्या अनुषंगाने नियमित तपासण्या गरजेच्या ठरतात. यामुळे वैद्यकीय स्थितीचे उत्तम व्यवस्थापन आणि सुविधांना मदत मिळेल. कालांतराने येणाऱ्या गंभीर परिस्थितीला अटकाव शक्य होतो. सर्वसमावेशक आरोग्य पॉलिसी सामान्यतः वार्षिक तपासण्या देऊ करते. एखाद्याला रुग्णवाहिकेचा खर्च, डेकेअर सर्जरी कव्हर मिळते.

4. परदेशातील डे केअर प्रक्रिया आणि उपचार खर्च समाविष्ट 

डे केअर ट्रीटमेंट म्हणजे 24 तासांहून कमी कालावधीत रुग्णालय किंवा डे केअर सेंटरमध्ये सामान्य अथवा लोकल एनस्थेशिया देऊन करण्यात येणारे उपचार. डायलेसिस, केमोथेरपी, अन्जियोग्राफी, रेडियोथेरपी, डोळ्यांची शस्त्रक्रिया, लिथोट्रीप्सी इत्यादी उपचार हे डे केअर प्रकियांत येतात. सर्वसमावेशक पॉलिसीत त्यावर विमा कवच मिळते. डे केअर प्रोसिजरमध्ये जितक्या अधिक प्रक्रियांचा समावेश असतो, तितके ते विमाधारकाच्या फायद्याचे असते. काही सूचीबद्ध वैद्यकीय स्थितीत परदेशात उपचारांची सुविधा काही पॉलिसी देऊ करतात. अशा पॉलिसीची निवड करणे हितकारक ठरते.

5. कॅशलेस मेडिक्लेम सुविधा प्रदान करते :

सर्वसमावेशक पॉलिसीत समाविष्ट नेटवर्क रुग्णालयांत कॅशलेस उपचार सुविधांचा समावेश असतो. ज्यामुळे तुमच्या गैरहजेरीत वडिलांच्या खांद्यावर रुग्णालय भरतीच्या खर्चाचा भार येत नाही. कंपनी स्वत: दाव्याचा निपटारा करते. इन्शुररकडे कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध असणाऱ्या नेटवर्क रुग्णालयाची यादी असते. कॅशलेस पर्यायाद्वारे तुमच्या वडिलाना त्यात नमूद कोणत्याही रुग्णालयात उपचार उपलब्ध होऊ शकतो. (Father’s Day special 5 Reasons to Buy Comprehensive Health Insurance for Your Father)

संबंधित बातम्या : 

भारतीय महिला Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करुन होऊ शकतात करोडपती, जाणून घ्या कारणं?

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.