AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही

SBI Loan | तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला मुदतीपूर्वी फेडायचे असेल तर त्यावर कोणता दंडही लागणार नाही. कमी व्याजदरासोबत कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी स्टेट बँकेने देऊ केला आहे. तसेच कर्जदरांना तीन महिन्यांच्या मोरेटोरियमची सुविधाही देण्यात आली आहे.

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी SBI कडून स्वस्त व्याजदरात कर्ज, जाणून घ्या सर्वकाही
तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 9:48 AM
Share

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांचा आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. अशा लोकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे. कवच पर्सनल लोन, असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही व्यक्तीला 25 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजनेमुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचा SBI चा मानस आहे. (Know about SBI Bank personal loan offer)

तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला मुदतीपूर्वी फेडायचे असेल तर त्यावर कोणता दंडही लागणार नाही. कमी व्याजदरासोबत कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी स्टेट बँकेने देऊ केला आहे. तसेच कर्जदरांना तीन महिन्यांच्या मोरेटोरियमची सुविधाही देण्यात आली आहे.

कोणतीही प्रोसेसिंग फी नाही

हे कर्ज देताना बँक तुमच्याकडून कोणतीही प्रोसेसिंग फी घेणार नाही. या कर्जासाठी वार्षिक व्याजदर 8.5 टक्के इतका आहे. तसेच फोर क्लोझर आणि प्री पेमेंटवरही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

कोणती व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते?

स्टेट बँकेचे पेन्शनधारक, नोकरी आणि व्यवसाय करणारी कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते. 1 एप्रिल 2021 नंतर तुम्हाला किंवा तुमच्या कुटंबातील कोणालाही कोरोनाची बाधा झाली असेल तर तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात. कर्ज घेण्यासाठी कोरोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

कर्ज घेण्यासाठी काय कराल?

तुम्हाला SBI कवच पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता. याशिवाय, SBI च्या योनो अ‍ॅपचा वापर करुनही तुम्ही कर्जासाठी अर्ज भरू शकता. कर्जाची रक्कम ग्राहकाच्या पगार किंवा बचत खात्यामध्ये जमा केली जाईल.

संबंधित बातम्या:

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार

6th Pay Commission बाबत मोठी बातमी, 1 जुलैपासून सर्व नियम लागू होणार

अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प

(Know about SBI Bank personal loan offer)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.