मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Jun 18, 2021 | 12:23 PM

Mumbai dabbawalas | आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर अनेकदा डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे प्रचंड कौतुक झाले आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने डबेवाल्यांची अवस्था बिकट करुन टाकली आहे.

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीसाठी परदेशी बँकेचा पुढाकार; 15 कोटींची मदत करणार
मुंबईचे डबेवाले

मुंबई: मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या डबेवाल्यांना कोरोना संकटामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने डबेवाल्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत एचएसबीसी (HSBC Bank)  ही विदेशी बँक डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. (HSBC bank will provide financial aid to Mumbai dabbawalas community)

HSBC बँकेने डबेवाल्यांच्या मदतीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे डबेवाल्यांना विमा, रेशन, नव्या सायकली आणि कुटुंबांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. सध्या मुंबईतील बहुतांश कार्यालये ही बंद आहेत किंवा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु आहेत. त्यामुळे ऑफिसमधील लोकांना डबे पोहोचवण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर अनेकदा डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे प्रचंड कौतुक झाले आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने डबेवाल्यांची अवस्था बिकट करुन टाकली आहे.

दोन लाख ग्राहकांना पुरवतात सेवा

डबेवाले हे मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात दररोज 2 लाख ग्राहकांना डबे पुरवण्याचे काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

इतर बातम्या:

Job News: तरुणांसाठी खुशखबर! भारतातील टॉप 5 आयटी कंपन्यांमध्ये 96 हजार नोकऱ्या

पंढरपूरच्या मजूर दाम्पत्याच्या मुलाची उंच भरारी, इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

(HSBC bank will provide financial aid to Mumbai dabbawalas community)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI