Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ज्वॉइन इंडियन नेव्ही तर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदावर काम करण्याची संधी आहे. (Indian Navy Recruitment 2021 SSC officer Executive Vacancy)

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा...
भारतीय नौदल

Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ज्वॉइन इंडियन नेव्ही तर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदावर काम करण्याची संधी आहे. या पदासाठी पगारही बक्कळ मिळणार आहे. भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यानुसार 50 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार अर्ज करु इच्छितात ते इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात. (Indian Navy Recruitment 2021 SSC officer Executive Vacancy)

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC officer) या पदासांठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 जून 2021 पासून सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 26 जून 2021 ही आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करायचा असल्यास joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावे. अर्ज भरताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करु नये, अन्यथा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

अर्ज कसा दाखल करायचा

स्टेप:1 जॉऊन इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट द्या.
स्टेप:2 वेबसाईटवरील करियर अँड जॉब्स ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप:3 अब एक्झ्यूक्यूटिव्ह ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप:4 तिथे Register with Aadhaar Virtual ID वर क्लिक करा.
स्टेप:5 आता नोंदणीमधील सर्व माहिती भरा.
स्टेप:6 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज दाखल करा.
स्टेप:7 जॉईन इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा.

पदांची संख्या

भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 50 पदांवर भरती होणार आहे. इंडियन नेव्हीच्या एक्झ्यूक्युटिव्ह ब्रांचमध्ये भरती केली जात आहे. (Indian Navy Recruitment 2021) नुसार जनरल सर्व्हिससाठी 47 जागा तर हायड्रो केडर पदासाठी 3 जागांवर भरती होईल.

पात्रता आणि वयोमर्यादा

भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार केवळ पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीई किंवा बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मात्र, उमेदवारांनी 60 टक्के गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

पगार किती मिळणार?

भारतीय नौदलात SSC अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर -10 नुसार 56,100 ते 1,10,700 पगार देण्यात येईल.

(Indian Navy Recruitment 2021 SSC officer Executive Vacancy)

हे ही वाचा :

Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!

SSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार? 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI