Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!

कोरोनाकाळाता (Coronavirus) नैराश्यचं वातावरण असताना, बेरोजगार किंवा नोकरीच्या (Job alert)  शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा 60 टक्के कंपन्या नव्या जागांसाठी तरुणांना संधी देणार आहे.

Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!
job

Recruitment 2021 : कोरोनाकाळाता (Coronavirus) नैराश्यचं वातावरण असताना, बेरोजगार किंवा नोकरीच्या (Job alert)  शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा 60 टक्के कंपन्या नव्या जागांसाठी तरुणांना संधी देणार आहे. एका सर्व्हेमध्ये हे स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगारही कापण्यात आले. मात्र यंदा पुन्हा एकदा विविध कंपन्या नोकरभरतीची तयारी करत आहेत. 60 टक्के कंपन्या तरुणांना नियुक्त करण्यात उत्सुक आहेत. (Job alert 60 percent companies wants to hire new talent this year : survey)

सर्व्हेमध्ये नेमकं काय?

मर्सर मेट्टलच्या रिपोर्टनुसार, कोरोनाकाळात आता अनेक कंपन्या नव्या जागा भरणार आहेत. आम्हाला प्रतिभाशाली युवकांची गरज असून आम्ही जागा भरणार आहोत, असं 60 टक्के कंपन्यांनी म्हटलं आहे.

कोरोना महामारीमध्ये गेल्या 14 महिन्यात नोकऱ्यांबाबत मोठा बदल झाला आहे. ‘द स्टेट ऑफ टॅलेंट रिपोर्ट 2021’ हा शिक्षण, सेवा, आर्थिक आणि व्यावसायिक सेवा, आरोग्य, आयटी, इलेक्ट्रिकल इत्यादी क्षेत्रातील 500 कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी आणि एचआर यांचा सर्वेक्षण करुन, हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मार्च आणि मेच्या दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे.

व्हर्चुअल हायरिंग

येत्या काळात नियुक्तीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. कारण सर्व्हेत सहभागी सर्वांनी कोरोना महामारीच्या काळात डिजीटल माध्यमांचा अधिक वापर केल्याचं म्हटलं. त्यामुळे येत्या काळात नियुक्तीची प्रक्रिया ऑनलाईनच असेल असं कंपन्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर 81 टक्के कंपन्यांनी व्हर्चुअल हायरिंग केल्याचं नमूद केलं आहे.

ऑफलाईन ते ऑनलाईन

बहुसंख्य कंपन्या कोरोनाकाळात ऑफलाईनवर ऑनलाईनमध्ये शिफ्ट झाल्या. त्याचा बराच फायदा झाल्याचं या कंपन्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या 

SSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार? 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

(Job alert 60 percent companies wants to hire new talent this year : survey)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI