गरीब मागासवर्गीयांना पगारातील 25 टक्के रक्कम, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी काळाच्या पडद्याआड

| Updated on: Aug 02, 2021 | 11:10 AM

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरूजी यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते.

1 / 5

2 / 5
1980 साली ते काँग्रेसचे तुळजापूरचे आमदार होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे खास संबंध होते.

3 / 5
शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर व त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत 28 शाळा सुरु केल्यात. शिक्षकाची नोकरी लागल्यापासून 25 टक्के पगार ते गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत असत

4 / 5
तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्षही होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते.मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या 'भारत जोडो' अभियानात ते सहभागी होते.

5 / 5
काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरु होते. आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.