शेतातील कामे आटोपून घरी येणाऱ्या महिलांवर काळाचा घाला, ट्रॉली कॅनालमध्ये पलटल्याने घडली ही दुर्दैवी घटना

काळजीपूर्वक वाहन चालवावे लागते. थोडीशी नगरचुकी झाली तर अपघात होतात. अशीच एक मोठी दुर्घटना सातारा जिल्ह्यात आज घडली.

शेतातील कामे आटोपून घरी येणाऱ्या महिलांवर काळाचा घाला, ट्रॉली कॅनालमध्ये पलटल्याने घडली ही दुर्दैवी घटना
| Updated on: Jun 24, 2023 | 10:16 PM

सातारा : राज्यात पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला. मजुरांची गरज भासू लागली. महिला शेतात दूर पायी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसतात. शेतात जाणारे रस्ते अरुंद असतात. अशावेळी अपघाताची शक्यता असते. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवावे लागते. थोडीशी नगरचुकी झाली तर अपघात होतात. अशीच एक मोठी दुर्घटना सातारा जिल्ह्यात आज घडली.

कारंडवाडी येथे ही दुर्घटना झाली. शेतातील रस्ते अरुंद होते. त्यामुळे कॅनलमध्ये चालकाचा तोल गेला. यात पाच महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यातून फक्त एक महिला बाहेर पडू शकली. इतर चारही महिला बुडाल्या. तिथंच त्यांचा शेवट झाला.

चार महिलांचा मृत्यू

कारंडवाडी येथे शेतातील कामे आटपून ट्रॉलीतून घरी निघालेल्या महिलांची ट्रॉली कॅनालमध्ये पलटी झाली. ट्रॉलीमध्ये पाच महिला बसल्या होत्या. त्यापैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉलीखाली अडकून जागीच मृत्यू झाला. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना ही घटना घडली. अपघातात एक महिला जखमी झाली. कारंडवाडी येथे आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

अशी आहेत मृतकांची नावे

मृत महिलांची नावे अलका भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), सर्व राहणार कारंडवाडी अशी आहेत. या चारही महिला घरातील ज्येष्ठ होत्या. त्यांच्यावर संसाराचा गाडा चालत होता. या चोघांचाही मृत्यू झाल्याने चार कुटुंब रस्त्यावर आले आहेत.

राज्यात पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला. ही शेतीची कामे सतत सुरू राहणार आहेत. त्यामुळे बाहेर निघताना काळजी घ्यावी लागणार आहे.