AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुर्माघर चित्रपटाची गडचिरोलीत निर्मिती, कलाकार म्हणून कोण काम करणार?

मासीक पाळीच्या वेळी महिला घरात राहत नाही. घराबाहेर एक छोटेसे घर बनवले असते, तिथ त्या राहतात. त्या घराबाहेरच्या छोट्याशा घराला कुर्माघर म्हणतात.

कुर्माघर चित्रपटाची गडचिरोलीत निर्मिती, कलाकार म्हणून कोण काम करणार?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 24, 2023 | 9:19 PM
Share

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली :  तुम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर… तर सोनेपे सुहागा म्हणावं लागेल. कारण ते चित्रत केलं जातं. शिवाय प्रसिद्धीही मिळते. पण, ही संधी कुण्या साधारण व्यक्तीला नव्हे तर आत्मसमर्पीत व्यक्तीला मिळाली तर.. तर मग त्यांचा आनंदाचा पारावार उरणार नाही. होय हे खरं आहे. आत्मसमर्पीत नक्षली आता चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.  गडचिरोली हा अतिसंवेदनशील जिल्हा. या जिल्ह्यात आदिवासी बांधव दुर्गम भागात राहतात. परंपरेनुसार ते आपले जीवनमान जगत आहेत. अशीच एक महिलांच्या बाबतीत परंपरा आहे. मासीक पाळीच्या वेळी महिला घरात राहत नाही. घराबाहेर एक छोटेसे घर बनवले असते, तिथ त्या राहतात. त्या घराबाहेरच्या छोट्याशा घराला कुर्माघर म्हणतात. या कुर्माघरावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

यांनी घेतल्या ऑडिशन

या चित्रपटासाठी तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी आज ऑडिशन घेतल्या. विशेष म्हणजे या ऑडिशन आत्मसमर्पित नक्षली महिला-पुरुषांच्या घेण्यात आल्या. तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी अगडबम, टुरिंग टॉकीज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, यासारखे चित्रपट निर्माण केले आहेत.

स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न

भविष्यात आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना चित्रपट सृष्टीत संधी मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेतला. आत्मसमर्पीत नक्षल्यांनी चित्रपटात काम करावे. स्वतःची नवी ओळख निर्माण करावी, यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ऑडिशनदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच आत्मसमर्पन शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे उपस्थित होते.

नवीन अनुभव

कुर्माघर या चित्रपटाच्या निर्मात्या तृप्ती भोईर यांनी या ऑडिशन घेतल्या. यावेळी आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांनी ऑडिशन दिल्या. त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. यापैकी काही जणांना चित्रपटात संधी मिळणार आहे. यामुळे आत्मसमर्पीत नक्षली आनंदित दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्याजोगा होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?