१६ वर्षीय विद्यार्थिनी शाळेतून परत येत होती…; आजचा दिवस तिच्यासाठी शेवटचा ठरला

अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात विजा कोसळल्या. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने काही लोकं घराबाहेर पडले नाही.

१६ वर्षीय विद्यार्थिनी शाळेतून परत येत होती...; आजचा दिवस तिच्यासाठी शेवटचा ठरला
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 6:18 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : विदर्भात आज पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. काही भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. यामुळे काही भागातील वीज गेली होती. मोबाईल नेटवर्कचीही समस्या झाली. पावसामुळे हवेत गारठा पडला. त्यामुळे काही जणांनी ऊनीचे कपडे बाहेर काढले. गडचिरोली जिल्हात जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पहिल्यांदाच संततधार पाऊस पडला.

गडचिरोलीत विजांचा गडगडाट

जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात मार्च महिना उन्हाळ्याचा प्रारंभ मानला जातो. परंतु, अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यातील विविध बाजारात सोयाबीन- हरभरा -मिरची पिक, कापूस दाखल झाली. असे असताना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात विजा कोसळल्या. पाऊस सुरू होता.

हे सुद्धा वाचा

घरच्यांना मोठी चिंता

स्वीटी रोजप्रमाणे शाळेत गेली. शाळेतील वेळ आनंदात घालवला. अशात शाळेला सुटी झाली. त्यानंतर ती घरी परतत होती. पण, घरच्यांना चिंता लागली होती. कारण बाहेर विजांचा आवाज येत होता. तेवढ्यात काळाने घाला घातला. शनिवारी पावसासोबतच विजा कोसळल्याने मालेरचक येथील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय १६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

स्वीटीच्या अंगावर कोसळली वीज

स्वीटी नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. चामोर्शी तालुक्यातील तलाठी साजा क्रमांक 1 नवेगावमध्ये अंतर्गत मालेरचक गाव येतो. मालेरचक मंडळ कुनघाडा येथील स्वीटी सोमनकर ही विद्यार्थिनी सकाळी १०.३० वाजता शाळेतून परत येत होती. अचानक अंगावर वीज कोसळल्याने कोसळून गंभीर जखमी झाली. तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले. उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला.

अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काही भागात विजा कोसळल्या. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने काही लोकं घराबाहेर पडले नाही. पण, सकाळीच शाळेत गेली होती. ती रोजप्रमाणे घरी परत येईल, ही आशा आता संपुष्ठात आली.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.