Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या अडचणी कमी होईना! मुंबई, अकोला, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा

| Updated on: Apr 15, 2022 | 6:56 PM

Gunratna Sadavarte: दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या अडचणी कमी होईना! मुंबई, अकोला, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा
Gunaratna Sadavarte
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कोल्हापूर : एसटी संपापासून चर्चेत आलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हे नोंद होत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांना सगळ्यात आधी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं होतं. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Sharad Pawar Silver Ola Bunglow) निवासस्थानी घडलेल्या प्रकारावरुन सदावर्तेंना सुरुवातील ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सातारा पोलिस सदावर्तेंना घेऊन गेले. मग सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्तेच्या अडचणी अधिकच वाढण्याची चिन्ह आहेत. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण काय?

एकीकडे शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला. यानंतर आता कोल्हापुरामध्ये कलम 153 अ नुसार गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोप काय?

दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिलीप पाटील यांचा आरोप काय?

मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा आरोप केलाय. तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचाी अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारं सदावर्तेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी दिलीप पाटील यांनी केली होती. दरम्यान, आता दिलीप पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरातही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?

  1. गुणरत्न सदावर्ते पेशाने वकील आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर लढा दिला होती. तेव्हापासून ते चर्चेत होते.
  2. एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  3. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं आहे.
  4. वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांमध्ये आणि चळवळींमध्ये सदावर्ते यांचा सहभाग असायचा.
  5. सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सदावर्ते यांनी सुरु केली होती. या संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते यांनी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
  6. सदावर्ते हे आता मुंबईत वकिली करतात. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी घेतलेली आहे.
  7. सदावर्ते दोनवेळा मॅटच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसंच ते बार काऊन्सिलच्या शिखर परिषदेवरही होते.
  8. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचं नाव जयश्री पाटील आहे. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव झेन आहे.
  9. गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिकाही केलेली होती.
  10. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 2018 साली हल्लाही करण्यात आलेला होता. मराठी आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीनंतर हा हल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती.