भाजप सोडून शिवबंधन बांधणाऱ्या नगरपालिकेच्या उपाध्यक्षांचा निषेध, खुर्ची वॉशिंग पावडरने धुतली

| Updated on: Jun 23, 2021 | 12:56 PM

नगसेवकांच्या पक्षबदलाचा निषेध नोंदविण्याकरिता येथील युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे राज्य प्रभारी राहुल दारुणकर यांनी आज अचानक येथील पालिका उपाध्यक्षांच्या कक्षात प्रवेश करुन त्यांची खुर्ची वॉशिंग पावडरने धुवून काढत अभिनव आंदोलन केले (Hinganghat Rahul Darunkar wash chair cf vicepresident of the municipality and protest against his party change decision).

भाजप सोडून शिवबंधन बांधणाऱ्या नगरपालिकेच्या उपाध्यक्षांचा निषेध, खुर्ची वॉशिंग पावडरने धुतली
Hinganghat News
Follow us on

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील नगरपालिकेचे उपाध्यक्षसह भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी पक्षबदल करीत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. या नगसेवकांच्या पक्षबदलाचा निषेध नोंदविण्याकरिता येथील युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे राज्य प्रभारी राहुल दारुणकर यांनी आज अचानक येथील पालिका उपाध्यक्षांच्या कक्षात प्रवेश करुन त्यांची खुर्ची वॉशिंग पावडरने धुवून काढत अभिनव आंदोलन केले (Hinganghat Rahul Darunkar wash chair cf vicepresident of the municipality and protest against his party change decision).

हिंगणघाट येथील नगरपालिकेच्या 10 नगरसेवकांनी सोमवारी भाजपला रामराम करीत मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय जनतेच्या हिताकरिता घेतलेला नसून स्वतःच्या स्वार्थाकरीता राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाशी त्यांनी जवळीक साधलेली आहे,असा आरोप दारुणकर यांनी केलेला आहे.

स्थानिक आमदार समीर कुणावार यांनी विश्वासाने प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक चंदू घुसे यांना नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसविले होते. त्यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा होती. मात्र, ते नगरपालिकेच्या स्वतंत्र दालनात जनतेच्या समस्येची सोडवून करतांना कधीच कुणाला दिसले नाही, असे दारुणकर यांनी म्हटले आहे.

नगर परिषदेचे उपाध्यक्ष चंदू घुसे हे प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदल करुन जनतेचा विश्वासघात करतात, असा आरोप करीत त्यांच्या या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी येथील युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे दारुणकर यांनी उपाध्यक्ष वापरत असलेली खुर्ची वॉशिंग पावडरने धुवून काढली.

Hinganghat Rahul Darunkar wash chair of vicepresident of the municipality and protest against his party change decision

संबंधित बातम्या :

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान

भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची खोचक टीका