AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची खोचक टीका

आशिष शेलार (ashish shelar) यांनी विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरचा दौरा केला. त्यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर 'हेराफेरी' सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची खोचक टीका
Ashish Shelar
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 5:49 PM
Share

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसींचे नेते असल्याचं केवळ भासवत आहेत. हे तिन्ही नेते महाविकास आघाडीत एक भूमिका घेतात आणि बाहेर वेगळी. हे तिघे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. (ashish shelar slams mahavikas aghadi leaders over obc reservation)

आशिष शेलार यांनी विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरचा दौरा केला. त्यानंतर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आज आंदोलनाची घोषणा केली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ओबीसींचे नेते असल्याचं भासवत आहेत. महाविकास आघाडीत हे नेते वेगळी भूमिका घेतात आणि बाहेर जनतेसमोर वेगळी भूमिका घेत आहेत. आरक्षण न टिकवणे हे आघाडीचं पाप आहे. भुजबळ, पटोले आणि वडेट्टीवारांनी त्यात हेराफेरी केली आहे. हे तिघे नेते हेराफेरी सिनेमातील कलाकारच आहेत, असा चिमटा शेलार यांनी काढला.

फडणवीसांनी काढलेला जीआर रद्द का केला?

आरक्षणाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. विकास गवळी याने ही याचिका दाखल केली. ते काँग्रेस आमदाराचे सुपुत्र आहेत. तर याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एकजण नाना पटोले यांच्या जवळचा आहे, असा दावा करतानाच फडणवीस सरकारने काढलेला जीआर रद्द का केला? याचं उत्तर भुजबळ, पटोले आणि वडेट्टीवारांनी द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

वडेट्टीवारांचा अभ्यास नाही

आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासाठी 14 ते 15 महिने का लागले? या 15 महिन्यात सरकारने न्यायालयात वेळकाढूपणा काढला. इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने देण्याचा विषय आहे का? याबाबत वडेट्टीवार यांचा अभ्यास नाही. असत्य पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

पंढरपुरात जे झालं तेच पालिकेत होईल

राज्यात निवडून येण्यासाठी जे जे करावं लागेल ते महाविकास आघाडी सरकार करत आहे. पण काहीही केलं तरी जे पंढरपुरात जे झालं तेच महापालिका निवडणुकीत होईल, असा दावा करतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला लाथा मारायचं ठरवलं असेल तर त्याचं त्यांनी बघून घ्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला. (ashish shelar slams mahavikas aghadi leaders over obc reservation)

संबंधित बातम्या:

2024मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान करायचंच; काँग्रेस शनिवारी राज्यभर करणार ‘संकल्प’

भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे पुन्हा गरजल्या

(ashish shelar slams mahavikas aghadi leaders over obc reservation)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.