भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवसेना भवनावरील राड्यावरून केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी समाचार घेतला आहे.

भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा
ashish shelar

वर्धा: शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवसेना भवनावरील राड्यावरून केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. आम्ही आंदोलनं करूच. उत्तर देण्याची वाट कसली बघताय?. भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला. (ashish shelar warns shiv sena over agitation at shivsena bhavan in mumbai)

आशिष शेलार आज वर्ध्यात आले होते. वर्ध्यात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राम मंदिराच्या मुद्यावरून सेना भवनासमोर झालेल्या गदारोळ वर संजय राऊत आणि अनिल परब यांनी भाजपाला उत्तर देऊ असं वक्तव्य केले होते. यावर शेलार यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असा सल्ला शेलार यांनी दिला.

सत्ताधारी एवढे का घाबरतात?

रामाला आणि राम मंदिराला बदनाम करण्याचं काम शिवसेनेकडून होत असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन होईल. ते करायचा आमचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते ते करतील. सत्ताधारी एवढे घाबरतात हा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे तर राऊतांचे नवीन प्रयोग

राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास चमत्कार घडेल अस वक्तव्य केले होते. त्यावरही शेलार यांनाही प्रतिक्रिया दिली. रोज रोज नवीन प्रयोग करणे आणि स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी वक्तव्य करणे हा उद्योग काही लोकांचा आहे. यात सामना आणि संजय राऊत हे अग्रणी आहेत, अशी टीका त्यांनी केली. असल्याची टीका केली.

जनता धडा शिकवेल

मुंबई येथील नालेसफाईवर मनसे आक्रमक झाली आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. मुंबईच्या नालेसफाईचा भांडाफोड हा मनसेपूर्वी भाजपाने पाहिला केला. आम्ही नालेसफाईचे राऊंड घेतले. त्यात 107 टक्के नालेसफाईचा दावा खोटा असल्याचं आम्ही दाखवून दिलं. या मुद्द्यावर मनसेने योग्य भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या महानगरपालिकेला खरंतर लाज वाटली पाहिजे. आम्ही जनतेला किती फसवतो, पण शिवसेनेला निर्लज्जपणे सत्ता चालवायची आहे आणि जनतेच्या मदतीच एकही काम करायचं नाही. अश्या पद्धतीच्या महानगरपालिकेच्या सत्ताधीशांना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असंही त्यांनी सांगितलं. (ashish shelar warns shiv sena over agitation at shivsena bhavan in mumbai)

 

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

Video : ‘अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, बीडमधील लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात तर काँग्रेस पक्ष आडवा येईल; भाई जगतापांचा शिवसेनेला इशारा

(ashish shelar warns shiv sena over agitation at shivsena bhavan in mumbai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI