जाणले वटवृक्षांचे महत्त्व, ९ वर्षापासून वटवृक्ष वाटप उपक्रम!, पंचक्रोशीत होतेय चर्चा

| Updated on: Jun 07, 2023 | 9:37 PM

लोहा-कंधार तालुक्यात नऊ वर्षापासून प्राणिता देवरे यांनी एक वृक्ष एक जीवन या संकल्पना महिला रुजविली. शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी वृक्षारोपण केले.

जाणले वटवृक्षांचे महत्त्व, ९ वर्षापासून वटवृक्ष वाटप उपक्रम!, पंचक्रोशीत होतेय चर्चा
Follow us on

राजीव गिरी, प्रतिनिधी, लोहा (नांदेड): एक वृक्ष-एक जीवन हा विचार समाजात रुजवणे गरजेचे आहे. यासाठी गेल्या नऊ वर्षापासून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्राणिता देवरे चिखलीकर या वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत वटवृक्ष वाटप करत आहेत. यंदाही शनिवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने देऊळगल्ली लोहा आणि खडंकी देवी मंदिर कंधार येथे वृक्षारोपण केले. महिलांना वटवृक्षरोपांचे वाटप प्राणिता देवरे चिखलीकर यांच्या वतीने करण्यात आले. वटपौर्णिमेला वृक्ष लागवडीचे महत्त्व तरच भविष्यात पूजेसाठी दिसतील.

 

महिलांना देण्यात आले वटवृक्ष

राजकीय नव्हे तर सामाजिक बांधिलकी आणि जाणीवजागृती व्हावी, यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्राणिता देवरे-चिखलीकर यांनी गेल्या नऊ वर्षापासून अखंडपणे वटपौर्णिमा निमित्ताने वटवृक्ष वाटप आणि वृक्षारोपण घेत आहेत. यंदाही लोहा शहरातील देऊलगली येथे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच महिलांना वटवृक्ष देण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे, माजी पंचायत समिती सदस्या सुरेखा वाले, अध्यक्षा सविता सातेगावे, डॉ. सविता घंटे, कल्पना गीते, वंदना डुमणे, देऊ गोरेंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे सुद्धा वाचा

 

उपक्रमाची फलश्रृती समोर आली

लोहा-कंधार तालुक्यात नऊ वर्षापासून प्राणिता देवरे यांनी एक वृक्ष एक जीवन या संकल्पना महिला रुजविली. शासकीय कार्यालय तसेच इतर ठिकाणी वृक्षारोपण केले. महिलांना मागील काळात जे वटवृक्ष दिले होते. त्याचे संगोपन आणि संवर्धन कसे केले. हे वटवृक्ष विथ सेल्फीद्वारा महिलांनी प्राणिता देवरे यांना दाखविले. त्यामुळे आपण हाती घेतलेल्या उपक्रमाची फलश्रुती समोर आली.

 

वृक्षारोपण आणि वटवृक्षांचे वाटप केले. त्या वृक्षांचे संगोपन महिलांनी अतिशय जीवापाडपणे जपल्याच्या भावना त्या महिलांनी व्यक्त केल्या. शिवाय देऊलगली येथे पडीत विहीर बुजवून फ्लोअर ब्लॉक बसवून दिले. त्यामुळे महिलांनी प्राणिता देवरे-चिखलीकर यांचे आभार मानले. सामाजिक उपक्रम कोणताही खंड न पडू देत घेत असतात. त्यामुळे प्राणिता देवरे यांच्या वटपौर्णिमा कार्यक्रम असो की अन्य कोणतेही उपक्रम याची उत्सुकता महिलांना असते.