Ahmednagar | अहमदनगरच्या पारनेरमध्ये प्रेमाचा चहा आता चक्क सोन्याच्या कपात मिळणार, 10 तोळ्यांच्या दोन कपात ग्राहकांना मिळणार चहा…

| Updated on: Aug 23, 2022 | 9:17 AM

पारनेर येथील चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही अनोखी शक्कल लढवलीये. पुजारी यांच्या प्रेमाचा चहा या चहाच्या दुकानाचे नुकताच उद्घाटन करण्यात आले. कालपासून या दुकानात सोन्याच्या कपात चहा ग्राहकांना दिला जातोयं. तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि 10 तोळ्यांचे दोन कप ठेवण्यात आले आहेत.

Ahmednagar | अहमदनगरच्या पारनेरमध्ये प्रेमाचा चहा आता चक्क सोन्याच्या कपात मिळणार, 10 तोळ्यांच्या दोन कपात ग्राहकांना मिळणार चहा...
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरला (Ahmednagar) पारनेर येथे प्रेमाचा चहा आता चक्क सोन्याच्या कपात मिळणार आहे. ऐकून आर्श्चय वाटले ना? मात्र, हे खरोखर आहे. अनेकांचे सोन्याच्या कपात चहा पिण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न प्रेमाचा चहा प्यायला गेल्यावर सत्य होणार आहे. कारण पारनेर येथील प्रेमाचा चहा (Tea) आता सोन्याच्या कपात मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य ग्राहकाला सोन्याच्या (Gold) कपात चहा प्यायला मिळणार आहे. प्रेमाचा चहा, येवले चहा असे चहा व्यवसायातील ब्रॅंड आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल कायम लढवतांना दिसतात. मात्र, यावेळी तर चक्क लोकांना सोन्याच्या कपात चहा प्यायला मिळणार आहे.

पारनेर येथील चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांची अनोखी शक्कल

पारनेर येथील चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही अनोखी शक्कल लढवलीये. पुजारी यांच्या प्रेमाचा चहा या चहाच्या दुकानाचे नुकताच उद्घाटन करण्यात आले. कालपासून या दुकानात सोन्याच्या कपात चहा ग्राहकांना दिला जातोयं. तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि 10 तोळ्यांचे दोन कप ठेवण्यात आले आहेत. सोन्याच्या कपात चहा पिण्यासाठी ग्राहकांनी मात्र मोठी गर्दी केलीयं. या प्रेमाच्या चहाच्या दुकानाची चर्चा आता राज्यभर रंगू लागलीयं.

हे सुद्धा वाचा

5 तोळ्याच्या सोन्याच्या कपमध्ये पिता येणार सर्वांना प्रेमाचा चहा

सोन्याच्या कपात आता प्रत्येकाला चहा पिण्याचा आनंद घेता येणार आहे. राज्यभरातून ग्राहक या सोन्याच्या कपातील चहा पिण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे 5 तोळ्याच्या सोन्याच्या कपामध्ये फक्त आणि फक्त दहा रूपयांमध्ये चहा पिता येणार आहे. सोन्याच्या कपात चहा पिण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 10 तोळ्यांचे दोन कप चहा पिण्यासाठी दुकानात ठेवण्यात आले आहेत. सोन्याचे कप आणि प्रेमाचा चहा पिण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सकाळपासूनच दुकानामध्ये बघायला मिळते आहे.