Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या

| Updated on: Apr 15, 2022 | 6:27 PM

नांदेड शहरा जवळच्या सिडको परिसरात जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत बळीरामपूर गावातील रहिवासी असलेले आरोपी किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे इतरांना त्रास देत नाचत होते. यामुळे मयत सचिन थोरात या तरुणाने किशोरला मिरवणुकीच्या बाहेर जाण्यास सांगितले. या वादातून किशोरने सचिनवर चाकूने सपासप वार केले.

Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या
नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड : जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका युवकाची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर गुरुवारी रात्री ही घटना घडली. सचिन थोरात असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर किशोर ठाकूर आणि आदिल शेख अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर सचिनचा मित्र सुमेध वाघमारे हा या हल्ल्यात जखमी (Injured) झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिरवणुकीत उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस दोघा आरोपींचा शोध घेत आहेत. (In Nanded a youth was stabbed to death in a minor dispute)

नाचण्याच्या वादातून चाकूने केले वार

नांदेड शहरा जवळच्या सिडको परिसरात जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत बळीरामपूर गावातील रहिवासी असलेले आरोपी किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे इतरांना त्रास देत नाचत होते. यामुळे मयत सचिन थोरात या तरुणाने किशोरला मिरवणुकीच्या बाहेर जाण्यास सांगितले. या वादातून किशोरने सचिनवर चाकूने सपासप वार केले. तसेच सचिनसोबत असलेला त्याचा मित्र सुमेध वाघमारेवर देखील आरोपीने चाकूने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी किशोर ठाकूर आणि आदिल शेख हे दुचाकीवर बसून फरार झाले. ग्रामीण पोलिस दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत. (In Nanded a youth was stabbed to death in a minor dispute)

इतर बातम्या

VIDEO | नोकरी गेली म्हणून थेट मेट्रो स्टेशनवर गेली आणि…; पुढे काय झालं ते धक्कादायक होतं, कारण तिला बोलताच येत नव्हतं

Thane Murder : धक्कादायक ! नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याकडून सुनेची गोळी झाडून निर्घृण हत्या