दिव्यांगांचं साहित्य पुराच्या पाण्यात सडलं, पण वाटप नाही, कोल्हापुरातील हलगर्जीपणा

| Updated on: Aug 19, 2021 | 10:56 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीकडे दिव्यांग लोकांसाठी आलेले जयपूर फूट पुराच्या पाण्यात अक्षरशः कुजून गेलेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय.

दिव्यांगांचं साहित्य पुराच्या पाण्यात सडलं, पण वाटप नाही, कोल्हापुरातील हलगर्जीपणा
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीकडे दिव्यांग लोकांसाठी आलेले जयपूर फूट पुराच्या पाण्यात अक्षरशः कुजून गेलेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय. केंद्र सरकारच्या दिव्यांग योजनेअंतर्गत जयपूर साहित्य 2 वर्षांपूर्वी पंचायत समितीला प्राप्त झाले होते. साहित्य पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी देखील मासिक सभांमध्ये याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र नुकत्याच आलेल्या महापुरात पंचायत समितीची इमारत पाण्याखाली गेली. यात जयपूर फूट खराब झालेत.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच दिव्यांगांसाठीच्या या साहित्याचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय. तसेच याची भरपाई अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पगारातून करावी, अशी मागणी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी केलीय.

दिव्यांग बांधवांसाठी आलेल्या इतर साहित्याचं वाटप पंचायत समितीने केलं. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे जयपूर फूटचं वाटप करता आलं नाही. खराब झालेले जयपूर फूट बदलून घेण्याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार सुरू असल्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन अश्‍लील चिठ्ठी पाठवली, कोल्हापुरात तिघांना अटक

अल्पवयीन मुलीचा सासरी नांदण्यास नकार, कोल्हापुरात बापाने लेकीला नदीत ढकललं

Delta Plus: कोल्हापूरवर नवं संकट, डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्यानं खळबळ, जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे पालकमत्र्यांचे आदेश

व्हिडीओ पाहा :

Jaipur foot decompose in Kolhapur due to flood