VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

| Updated on: Jul 12, 2021 | 3:08 PM

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आजपासून धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

VIDEO | जळगावात तुफान पाऊस, हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले
Jalgaon hatnur dam
Follow us on

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आजपासून धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Jalgaon hatnur dam overflow 16 gates opened)

जळगावात तुफान पाऊस 

जळगावातील भुसावळ तालुक्यात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45 हजार 803 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नदीपात्रात गुरेढोरे न सोडण्याचे आवाहन 

येत्या काही तासात नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल आणि नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल. तसेच पुढील 24 ते 48 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनाने कडून कळविण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

(Jalgaon hatnur dam overflow 16 gates opened)

संबंधित बातम्या  

Kokan Rain | कोकणात अतिवृष्टीचा इशारा, चिपळूणच्या विशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ

नांदेडमध्ये ढगफुटी, कोकणतल्या नद्यांना पूर, जळगावात हतनूरमधून पाण्याचा विसर्ग, राज्यात पावसाची स्थिती कशी?

Nanded Rain | नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे नुकसान