जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजप नेत्याचं धक्कादायक विधान

| Updated on: Feb 06, 2023 | 6:47 AM

बहुजनांचा इतिहास तुम्हाला का खुपतो? हेच आम्हाला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजप नेत्याचं धक्कादायक विधान
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधान भोवणार असल्याचं दिसत आहे. आव्हाड यांच्या या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी आपण ते विधान कोणत्या संदर्भाने केलं हे स्पष्ट करूनही त्यांच्याविरोधात टीका होताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.

जळगावात पोस्टर जाळले

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तर चपला मारणार

आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली असून जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे.

केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. भविष्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे असे वक्तव्य राहिल्यास रोडवर चपला मारल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशाराही भोळे यांनी दिला.

आव्हाडांनी बाजू मांडली

दरम्यान, आपल्या विधानाचे पडसाद उमटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली आहे. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण, अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिलशाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं आव्हाड म्हणाले.

 

बहुजनांचा इतिहास का खुपतो?

बहुजनांचा इतिहास तुम्हाला का खुपतो? हेच आम्हाला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. भाजपचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो.

आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. ‘आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा’ ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टीका केलीत त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाली आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात षडयंत्र

गेली काही महिने सातत्याने बहुजन महापुरुषांचा मनाला येईल तेव्हा अपमान करण्याचं एक षडयंत्र महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. संत तुकारामांपासून छत्रपती संभाजीमहाराजांपर्यंत अपमान केला जातोय.

हे पक्षाचं राजकारण नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी बोलत नसतो. आम्ही नॉन पॉलिटकल प्लॅटफॉर्मवर जाऊन बहुजनांचा इतिहास सांगत असतो. आवाज बहुजनांचा आहे ना हे नेमकं भाजपचं दुखणं आहे, अशी टीका त्यांनी केली.