Sangli Crime : सांगलीत फार्म हाऊसमधून लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

| Updated on: May 27, 2022 | 1:05 AM

मिरज पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप तरी सीमा शुल्क विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Sangli Crime : सांगलीत फार्म हाऊसमधून लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई
सांगलीत फार्म हाऊसमधून लाखोंचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी येथील फार्म हाऊसवर छापा (Raid) टाकून अंमली पदार्थां (Drugs)चा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे सीमा शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जवळपास लाखो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त (Seized) केला आहे. जप्त केलेला अंमली पदार्थ कोणता आहे? तसेच नेमका किती साठा जप्त केला आणि फार्म हाऊसवर नेमकी काय कारवाई सुरु करण्यात आली आहे, याबाबत सीमा शुल्क विभागाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

उद्योजकाच्या फार्म हाऊसवर कारवाई झाल्यामुळे प्रचंड खळबळ

मिरज पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप तरी सीमा शुल्क विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर ही कारवाई केल्याचे समजते. सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला आणि अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. त्यानंतर उशिरापर्यंत छापेमारी आणि झाडाझडतीची कारवाई सुरू होती. मात्र हा अंमली पदार्थ कोणता? साठा नेमका किती ? याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

पुण्यातील पथकाच्या कारवाईची परिसरात चर्चा

सांगली जिल्ह्यातील फार्म हाऊसवर कारवाई करण्यासाठी थेट पुणे येथील सीमा शुल्क विभागाचे केंद्रीय पथक आले आणि अचानक छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. त्यामुळे पुणे सीमा शुल्क विभागाच्या कारवाईबाबत मिरज शहरात संपूर्ण दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, पुण्यातील पथकाने सांगली जिल्ह्यातील पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. त्यामुळे अमली पदार्थाबाबत सर्वप्रथम माहिती कोणाला मिळाली असावी, पुण्यातील पथकाला कि सांगली जिल्ह्यातील सीमा शुल्क विभागाच्या पथकाला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Lakhs of narcotics seized from farm house by Sangli customs department)

हे सुद्धा वाचा