Video :’आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमकुलीचा व्हिडीओ व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल

Video :'आईला मारू नको ना बाबा....!' नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमकुलीचा व्हिडीओ व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल
'आईला मारू नको ना बाबा....!'
Image Credit source: TV9

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता समोर आली आहे. व्हिडीओ आहे, अकोल्याच्या कृषीनगर भागातील पंचशील नगरातील. येथील रहिवाशी असलेल्या पतीने क्षुल्लकशा कारणावरून बेदम मारहाण सुरु केली आहे. तो पत्नीला अमानुष मारहाण करतोय आणि त्याचवेळी त्याचे क्रूर कृत्य त्याची चिमकुली मुलगी पाहत आहे.

गणेश सोनोने

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 27, 2022 | 12:54 AM

अकोला : सोशल मीडियात बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणतात. तसाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडिया (Social Media)वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये पती आपल्या पत्नीला अमानुष मारहाण (Beating) करीत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ अधिक प्रमाणात पहिला जात आहे, तो नराधम पित्यापुढे हात जोडणाऱ्या चिमकुलीच्या आर्त विनवणीमुळे. व्हिडिओमध्ये नराधम पती त्याच्या पत्नीला मुलीदेखतच बेदम मारहाण करतो आहे आणि त्याला त्याची चिमुकली मुलगी ”आईला मारू नको ना बाबा….!” अशी विनवणी करीत आहे. व्हिडीओमध्ये मुलीची आर्त विनवणी ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील घटनेचा असल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नीचे तोंड दाबून बेदम मारहाण केल्याचे उघड

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता समोर आली आहे. व्हिडीओ आहे, अकोल्याच्या कृषीनगर भागातील पंचशील नगरातील. येथील रहिवाशी असलेल्या पतीने क्षुल्लकशा कारणावरून बेदम मारहाण सुरु केली आहे. तो पत्नीला अमानुष मारहाण करतोय आणि त्याचवेळी त्याचे क्रूर कृत्य त्याची चिमकुली मुलगी पाहत आहे. या नराधम पतीचे नाव मनिष कांबळे असे आहे. तो पत्नी संगिताला मारहाण करीत असून तिचे तोंड दाबत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

अनेक वर्षांपासून वाद; जीवे करण्याचा प्रयत्न

मनीष कांबळे व त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. मनिषने संगिताला अंधारात ठेवत दुसरे लग्न केल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या तीन दिवसांपूर्वी दुपारी मनिषने संगिताला अमानुषपणे मारहाण करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संगीताची मुलगी ”आईला मारू नको ना बाबा….!,” अशा प्रकारची विनवणी करीत असताना व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये तिचा चेहरा दिसत नाही. सुदैवाने संगीताची पतीच्या तावडीतून सुटका झाली. आरोपी मनिष कांबळेविरोधात अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी मनीष कांबळे याला न्यायालयात हजर केले. जिल्हा सत्र न्यायाल्याने त्याला जामीन मंजूर केला आहे. (Inhuman beating of wife by husband, video goes viral on social media)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें