भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपधारकांची वीज कापली; धानाला पाणी कसं द्यायचं, शेतकऱ्यांसमोर प्रश्न

थकीत कृषी पंप धारकांची वीज कपात करण्यात आली आहे. आधीच पावसाने पाठ फिरविली असून शेतीला पाणी कसा द्यावा असं प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवीन संकट येऊन ठेपलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपधारकांची वीज कापली; धानाला पाणी कसं द्यायचं, शेतकऱ्यांसमोर प्रश्न
भंडारा शेती पंपाची वीज कापली
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 6:27 PM

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा: जिल्ह्यातील थकीत कृषी पंप धारकांची वीज कपात करण्यात आली आहे. आधीच पावसाने पाठ फिरविली असून शेतीला पाणी कसा द्यावा असं प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एक नवीन संकट येऊन ठेपलं आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाळा लागताच शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली मात्र आता पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पाहत आहे की पाऊस कधी पडेल त्यातच आता महावितरणने शेतकऱ्यांची विद्युत कट केल्यामुळे आता शेतीला पाणी कसा द्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांकडे पडला आहे. आधीच धानाचे बोनस वेळेवर मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची वीजबिल थकीत आहेत. सरकारने धानाचे बोनस लवकर दिले असते तर वीजबिल भरणा वेळेवर झाला असतां, आता शेतकऱ्यांनी लावलेल्या धानाचं 30% नुकसान झालं आहे.

धान कसं वाचवायचं?

एकीकडं धानाचा उशिरा मिळणारा बोनस आणि दुसरीकडं महावितरणंनं वीज कापल्यानं पीक कसं वाचवयाचं, असा सवाल शेतकऱ्यांपुढं उभा राहिला आहे.पाऊस पडत नसल्याने उर्वरित धानाची पिक कसे वाचावावे या चिंतेत शेतकरी सापडला आहे. तर सरकारने काहितरी मुदत वाढवून द्यावी अन्यथा धान पीक पूर्णतः नष्ट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

शेतकऱ्यांनी वीजबिल भरावं

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारणा केली असताना वीज ही सरकार तयार करत नाही. प्रायव्हेट कंपन्या तयार करतात त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज भरणे गरजेचे आहे. जे शेतकरी वेळेवर वीजबिल भरणा करतील त्यांचे वीज कापण्यात येणार नसल्याचे खडे बोल ऊर्जामंत्री सुनावले आहे.

भंडारा जिल्ह्यात भाजपचं मंदिर उघडण्यासाठी आंदोलन

भाजपने मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. भंडारा जिल्ह्यात भाजपाने मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बीयर बार सुरू झाले मात्र लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिर अद्यापही बंद आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. सरकारचे डोळे उघडण्यासाठी भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोसणाबजी देत शहरातील बहिरंगेस्वर मंदिरासमोर आंदोलन केलं आहे.

इतर बातम्या:

VIDEO: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, अडचणींकडे लक्ष देण्याची केली विनंती

Mahadiscom cut connection of agricultural pump set in Bhandara Farmers facing problem

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.