N. D. Patil Medical Bulletin : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर, कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार

| Updated on: Jan 17, 2022 | 11:26 AM

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N. D. Patil) यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) अँपल सरस्वती या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे.

N. D. Patil Medical Bulletin : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर, कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार
एन डी पाटील,ज्येष्ठ नेते
Follow us on

कोल्हापूर: शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N. D. Patil) यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) अँपल सरस्वती या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रा. एन.डी. पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळं आणि थंडी वाढल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असून चिंताजनक असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रा. एन.डी. पाटील यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. डॉ.अशोक भूपाळी (Dr. Ashok Bhupali) यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. एन.डी. पाटील सर 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून अ‌ॅडमिट केलं गेलं, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली आहे. एन. डी. पाटील यांनी गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचं काम केलं आहे.

चार दिवसांपासून शुद्ध हरपली

डॉ. अशोक भूपाळी यांनी एन.डी. पाटील यांची सध्या शुद्ध हरपली असल्याची माहिती दिली. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे कोणतेही मोठे उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी यांनी सांगितलं.

प्रकृती ढासळतेय

प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली आहे. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाल्याचं डॉ. भूपाळी यांनी म्हटलं आहे. प्रा. एन.डी पाटील याचा श्वासोच्छ्वास कमी झाला आहे.सध्या ते ऑक्सिजन वर आहेत, असंही डॉ. अशोक भूपाळी म्हणाले आहेत.

मे 2021 मध्ये कोरोनावर मात

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली

इतर बातम्या:

Kolhapur | ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी पाटील यांची प्रकृती गंभीर; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

फायद्यांसोबतच लसणाचे नुकसानही आहेत, तुम्हाला माहितीये का..?

Maharashtra Senior Leader N D Patil Medical Bulletin Dr. Ashok Bhupali gave health update said he is serious and admitted to private hospital in kolhapur