“अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले”; भाजपच्या आमदाराने मविआवर तोफ डागली

ज्यात नऊ दहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. त्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, गरीब-मराठा शेतकऱ्याचा मुलगा बंड करून महाविकास आघाडीची सत्ता घालवतो, हा राजकारणातील खूप मोठा बदल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले; भाजपच्या आमदाराने मविआवर तोफ डागली
| Updated on: May 31, 2023 | 5:18 PM

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच आजही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांसह त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर जंयतीचे राजकारण करुन विरोधकांना कशी पोळी भाजायची आहे, त्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लंडग्याला आपण हाकलून लावले आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करताना सत्तेचा माज चांगला नसतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी केलेल्या चुकांवर बोट ठेवताना त्यांच्यावर झालेल्या राजकारणाची आठवण त्यांनी करुन दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस आणि प्रशासनच्या नावाखाली कशा प्रकारचे राजकारण केले गेले.

त्यावरूनही त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या आडून जास्त दिवस राजकारण चालत नसते असा टोलाही त्यांनी मविआला लगावला आहे.

तर दुसरीकडे राज्यात नऊ दहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. त्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, गरीब-मराठा शेतकऱ्याचा मुलगा बंड करून महाविकास आघाडीची सत्ता घालवतो, हा राजकारणातील खूप मोठा बदल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.