Nandurbar ST | नंदूरबार एसटीचे 89 गैरहजर असल्यानं प्रवाशांचे हाल; नवापूर आगाराचे बहुतेक कर्मचारी गैरहजर

| Updated on: Apr 29, 2022 | 1:17 PM

नवापूर आगारातील जास्त कर्मचारी है गैरहजर आहेत. धुळे आगारातून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरचं ते रुजू होतील. तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्ण क्षमतेनं नवापूर आगारातील बस धावतील. त्यानंतरच गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल कमी होतील.

Nandurbar ST | नंदूरबार एसटीचे 89 गैरहजर असल्यानं प्रवाशांचे हाल; नवापूर आगाराचे बहुतेक कर्मचारी गैरहजर
नंदूरबार एसटीचे 89 गैरहजर असल्यानं प्रवाशांचे हाल
Image Credit source: tv 9
Follow us on

नंदूरबार : एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff) संप मिटल्यानंतर चारही आगारातील कामकाजाला वेग आला आहे. यात 951 चालक आणि वाहक हजर झाले आहेत. मात्र अद्यापही 89 चालक आणि वाहक गैरहजर आहेत. त्यांच्यावर केलेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर त्यांना धुळ्याच्या वाऱ्या करण्याची वेळ आली आहे. धुळे विभागातून प्रमाणपत्र (Certificate) मिळाल्यानंतर हे सर्व कर्मचारी कामावर परत येतील. यातील सर्वाधिक कर्मचारी हे नवापूर आगारातून आहेत. उर्वरित शहादा आणि नंदूरबार आगारातील आहेत. बडतर्फीनंतर त्यांनी केलेल्या अपिलावर धुळे येथील विभागीय (Dhule Division) कार्यालयातून तारीख दिल्यावर ते कामावर हजर होणार आहे. 89 कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातील मुक्काम यांच्या गाड्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. हे कर्मचारी लवकर कामावर आल्यावर ग्रामीण भागातील मुक्कामाच्या गाड्या देखील सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

नंदुरबार जिल्ह्यात चार आगार आहेत. धुळे विभागीय आगारात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांकडं लक्ष दिलं जात नाही. धुळे विभागाला कर्मचारी फेऱ्या मारतात. सर्वाधिक कर्मचारी नवापूर आगारात आहेत. गुजरातच्या सीमेवरील बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत. वेगवेगळ्या कारणासाठी लोकं गुजरातला जातात. पण, बस अजूनही सुरू झाल्या नाहीत. खासगी वाहनचालक जास्त भाडं आकारतात. त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.

नंदूरबार आगारांची परिस्थिती

नंदूरबार आगारात 502 हजर, तर 2 गैरहजर कर्मचारी आहेत. शहादा आगारात 426 हजर, 2 गैरहजर कर्मचारी आहेत. नवापूर आगारात 242 हजर, तर 83 गैरहजर कर्मचारी आहेत. अक्कलकुवा आगारात 214 हजर कर्मचारी आहेत. नवापूर आगारातील जास्त कर्मचारी है गैरहजर आहेत. धुळे आगारातून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरचं ते रुजू होतील. तेव्हा खऱ्या अर्थानं पूर्ण क्षमतेनं नवापूर आगारातील बस धावतील. त्यानंतरच गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल कमी होतील.