पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसचा टोला

| Updated on: Jul 25, 2021 | 11:58 PM

पुरामुळे मृत्यू झालेल्या आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये," असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला

पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये, राणेंच्या त्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा टोला
NAAN PATOLE AND NARAYAN RANE
Follow us on

गोंदिया : “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नसतो. पुरामुळे मृत्यू झालेल्या आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये,” असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना त्यांचे नाव न घेता लगावला. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याची पूरस्थिती तसेच इतर विषयांवर सविस्तर भाष्य केले. (Narayan Rane should not use flood victims as political card and said Nana Patole)

मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये

राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यानंतर याच वक्तव्याचा आधार घेत नाना पटोले यांनी राणे यांच्यावर पलटवार केला. “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करु नये. तसेच मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असे नाना पटोले म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली. “राज्यात संकटं येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी खोचक राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरपरिस्थितीची 25 जुलै रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. काल मी तळीये गावात गेलो होतो. दरडी कोसळायला लागल्या आहेत. पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन-चार दिवसात आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल. सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले.

इतर बातम्या :

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, जळगावातील धक्कादायक घटना

मनसे म्हणतं, बॉलिवूडचं एक ट्विट नाही, आणि अक्षय कुमारचा व्हिडीओ आला, काय आहे त्यात?

Video | बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा औरंगाबादेत अपघात, लुटीसाठी लोकांची गर्दी

(Narayan Rane should not use flood victims as political card and said Nana Patole)