PHOTOS : वर्ध्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात, नितीन गडकरींकडून पाहणी
महाराष्ट्र आणि देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच तयारीला लागले आहेत. आता वर्धामध्ये बऱ्याच प्रयत्नाने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे.

- महाराष्ट्र आणि देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच तयारीला लागले आहेत. आता वर्धामध्ये बऱ्याच प्रयत्नाने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (6 मे) जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट देत पाहणी केली.
- नितीन गडकरी म्हणाले, “या उत्पादनामुळे महाराष्ट्रात केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, ब्लॅक मार्केटिंग थांबेल. रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालं आहे हा आनंदाचा विषय आहे. अनेक रुग्ण या औषधाकरिता तडफडत आहेत. लोकांना अस्वस्थ करणारे अनुभव आले आहेत.”
- देशात जेनेटिकला पहिली परवानगी मिळाली आहे. याचं जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात वितरण होईल. पहिल्यांदा नागपूर शहर आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होईल. याशिवाय महाराष्ट्रतही इतर ठिकाणी याचं वितरण होईल. वर्ध्याला प्राधान्य मिळेल. अनेक लोकांच्या सहकार्याने हे शक्य झालं आहे, असंही गडकरींनी नमूद केलं.
- नितीन गडकरी म्हणाले, “मी डोळ्यानं उत्पादन बघितलं. गोरगरीब लोकांच्या प्राणाचे रक्षण होईल. हे कठीण काम होतं, पण यशस्वी झालंय. भिलाईवरून ऑक्सिजन आणण्यात येणार आहे. सेवाग्राम, सावंगी रुग्णालयांना 20 टन ऑक्सिजन मिळणार आहे. व्हेंटिलेटर द्यायला तयार आहेत. त्याचा उपयोग झाला पाहिजे. सर्वांनी हिमतीने याचा प्रतिकार केला पाहिजे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. हे संकट मोठं आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेता यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन तयार असायला पाहिजे.”
- “एकाचाही ऑक्सिजनविना, औषधाविना मृत्यू होता कामा नये. याची दखल घेण्याचा सगळे जण प्रयत्न करत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, मास्क लावावा, सॅनिटायजर वापरावं, सोशल डिस्टनसिंग पाळाव, असं आवाहन गडकरी यांनी केलंय. तसेच हे कोरोनाचं संकट मोठं आहे. याकरिता सर्वांनी एकत्र येत सहकार्य करणे अपेक्षित आहे. सर्वांच्या सहकार्याने हे संकट दूर होईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us