Osmanabad | तुळजाभवानी मातेच्या उत्पन्नात 4 महिन्यात मोठी वाढ, Corona नंतर देणगीचा ओघ, 13 कोटींची भरपाई

| Updated on: Mar 19, 2022 | 11:15 AM

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात लवकरच विकासात्मक बदल करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Osmanabad | तुळजाभवानी मातेच्या उत्पन्नात 4 महिन्यात मोठी वाढ, Corona नंतर देणगीचा ओघ, 13 कोटींची भरपाई
उस्मानाबाद येथील तुळजाभवानी मातेची पूजा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उस्मानाबाद | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या (Tuljapur temple) मंदिर संस्थानच्या उत्पन्नात गेल्या 4 महिन्यात 13 कोटींची भर पडली असून मंदिर कोरोना काळात बंद होते मात्र ते सुरु झाल्याने भाविक (Devotees) मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असून त्यांनी दिलेल्या देणगी , सशुल्क दर्शन यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. मंदिराचे उत्पन्न वाढले असून यात भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी व देणगी याचा समावेश आहे. तुळजाभवानी देवीच्या विकासासाठी निर्णय व प्रयत्नामुळे तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या (Gold And Silver) दागिन्यातही वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात मंदिर अनेक महिने बंद होते त्यामुळे भाविकांना कुलाचार, नवसपूर्ती करता आली नव्हती. त्यामुळे सध्या मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात सशुल्क दर्शन सुरु केल्याने उत्पन्नात भर पडली आहे.

चार महिन्यात किती वाढले उत्पन्न?

ऑक्टोबर 2021 या महिन्यात मंदिराला विविध मार्गातून 3 कोटी 74 लाख रुपये, नोव्हेंबर महिन्यात 3 कोटी 82 लाख, डिसेंबर 4 कोटी 10 लाख व जानेवारी 22 या महिन्यात 2 कोटी 40 लाख उत्पन्न झाले. यात दर्शन पासमधुन ऑक्टोबर महिन्यात 1 कोटी 55 लाख, नोव्हेंबर 1 कोटी 84 लाख, डिसेंबर 1 कोटी 61 लाख तर जानेवारीत 75 लाखांचे उत्पन्न झाले. 2018-19 या वर्षात 28.91 कोटी, 2019-20 या वर्षात 26.15 कोटी, 2020-21 या वर्षात 9.99 कोटी तर 2021-22 या वर्षात केवळ 4 महिन्यात 13 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

भाविकांना घरबसल्याही दर्शनाची सुविधा

तुळजाभवानी देवीला रोख देणगी, सोने चांदी वस्तू व इतर भेट देणाऱ्या भाविकांना देवीचे थेट दर्शन , तुळजाभवानी देवीची प्रतिमा फोटो देऊन मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात येत असून या आदरतिथ्यमुळे भाविकात समाधान असून देणगीदार यांची संख्या वाढत आहे. शिवाय दररोज तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने देवीच्या रोजच्या पुजा, विधी यांचे फोटो व व्हिडिओही वेबसाईट आणि इतर सोशल मिडियावर पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांना घरबसल्या रोज देवीचे दर्शन होत आहे.

जेजुरीच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिरचा विकास आराखडा

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात लवकरच विकासात्मक बदल करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.अंदाजे 200 कोटींवर असलेल्या विकास आराखड्यात दर्शन मंडप, स्कायवॉक, अभिषेक हॉलसह विविध विकासकामांचा समावेश आहे. मंदिरात एकाचवेळी 1 लाख भाविकांना थांबता येईल, एवढ्या क्षमतेच्या दर्शन मंडपासह मंदिराबाहेर पडण्यासाठी तीन मार्ग नव्या आराखड्यात असतील.  तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे, जनसंपर्क तथा धार्मिक अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह पाळीकर, उपाध्ये व सोळा आणे भोपे पुजारी मंडळ यांनी केलेल्या प्रयत्नाने तुळजाभवानी मंदिरात अनेक सुधारणा होत आहेत.

गाभारा सोन्याचा होणार

तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभरा हा पुरातत्व नियमानुसार परवानगीने सोन्याचा करण्यात येणार आहे. देवीचा गाभाऱ्यात सोन्याने मढविलेला पत्रा बसविण्यात येणार आहे. या प्रकाळपासाठी अनेक भविकांनी तुळजाभवानी देवीला यासाठी सोने देण्याची व मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यातून हे काम करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

शाब्बास गं रणरागिणी! उधळणाऱ्या बैलाला तरुणीनं केलं शांत, व्हिडीओ व्हायरल

औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?, तिघात चौथा नकोच: Sanjay Raut