वसईतील आदिवासी बांधवांना दिवाळी भेट, 306 हेक्टर जमिनीच्या वनपट्ट्यांच्या प्रमाणपत्राचं वाटप

वाळीच्या पूर्व संध्येला वसई ताल्युक्यातील आदिवासी बांधवांना सरकार कडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. वसईचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांनी 306 हेक्टर वनहक्क जमिनी त्यांच्या नावावर झाल्याचे घोषित करून, 50 आदिवासी बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले आहे.

वसईतील आदिवासी बांधवांना दिवाळी भेट, 306 हेक्टर जमिनीच्या वनपट्ट्यांच्या प्रमाणपत्राचं वाटप
पालघर जमिनींच्या पट्ट्यांचं वाटप


पालघर (वसई) : दिवाळीच्या पूर्व संध्येला वसई ताल्युक्यातील आदिवासी बांधवांना सरकार कडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. वसईचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांनी 306 हेक्टर वनहक्क जमिनी त्यांच्या नावावर झाल्याचे घोषित करून, 50 आदिवासी बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हे गिफ्ट आदिवासी बांधवाना मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आदिवासी बांधवांच्या संघर्षाला यश

वसईच्या महसूल विभागाने आदिवासी बांधवांच्या ताब्यात असलेल्या वनजमिनीवरील त्यांच्या नावे वनपट्टी लावल्या आहेत. वनजमिनीवर आपल्या नावे वनपट्टे लावण्यासाठी आदिवासी बांधवांनी तब्बल 35 ते 40 वर्ष शासनाशी संघर्ष केला होता. त्यानंतर 1996 साली आधिवासी बांधवांच्या बाजूने वनहक्क कायदा काढला गेला. मात्र, त्यात ब-याच त्रुटी होत्या. शेवटी 2006 साली त्यात सुधारणा करुन, नव्याने सुधारित वनहक्क कायदा अंमलात आला. आता आदिवासीच्या वनजमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आदिवासींना वनपट्टे मिळाल्याने सर्वांच्या चेह-यावर आनंदाची भावना दिसून आल्याचं श्रमजीवी संघटनेचे वसई तालुका उपाध्यक्ष सुनील वारणा यांनी सांगितलं.

306 हेक्टरच्या वनजमिनींच्या पट्ट्यांचं वाटप

वसईचा प्रांत अधिका-यांनी आज वसईतील भाताने, आडाणे, भिनार, सकवार, वाडघर येथील 50 आदिवासी बांधवांच्या नावावर 306 हेक्टर जमिनीच्या वनपट्टे केले आहेत. यामुळे आता ते या जमिनीवर शासकीय योजनेचा लाभ घेतील. तसेच शेती, भाजीपाला लागवड करुन, उत्पन्न घेवू शकतात. त्यांच्या नावावर त्या जमिनीचा सातबारा ही आता होईल. त्यामुळे आता आदिवासी ख-या अर्थाने जमिनीचे मालक होणार असल्याचं मत प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या:

Dadra and Nagar Haveli Lok Sabha by Poll Result live: शिवसेना दादरा नगर हवेलीत खातं उघडणार? मतमोजणीला सुरुवात

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, चंद्रकांतदादा म्हणतात, ‘चुकीला माफी नाही!’

Palghar Vasai 50 Tribal People get 306 hector forest land on the wake of Diwali

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI