अटक वॉरंटचा कागद दाखवा, स्वत: गाडीत येऊन बसतो, जठारांचं आव्हान, पोलिसांकडे वॉरंट नसल्याचा दावा

केंद्रीय सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीचे एसपी आले आहेत. अटक वॉरंट नसतानाही ते राणेंना अटक करू पाहत आहेत. (police don't have arrest warrant against narayan rane, says pramod jathar)

अटक वॉरंटचा कागद दाखवा, स्वत: गाडीत येऊन बसतो, जठारांचं आव्हान, पोलिसांकडे वॉरंट नसल्याचा दावा
pramod jathar

संगमेश्वर: केंद्रीय सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीचे एसपी आले आहेत. अटक वॉरंट नसतानाही ते राणेंना अटक करू पाहत आहेत. पाच मिनिटात राणेंना अटक करण्याचे वरून आदेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, असा गंभीर आरोप करतानाच आम्ही अटक करून घ्यायला तयार आहोत. पण पोलिसांनी अटक वॉरंट दाखवावं, असं आव्हानच भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलं आहे. (police don’t have arrest warrant against narayan rane, says pramod jathar)

नारायण राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीचे एसपी राणेंकडे आले. त्यानंतर बराच वेळ राणेंनी कागदपत्रं तपासली त्यानंतर प्रमोद जठार यांनी मीडियाशी संवाद साधतानाच पोलिसांवर गंभीर आरोप केले. अटक करण्यासाठी एसपी आले. आम्ही अटक वॉरंट दाखवण्याची विनंती केल. पण आमच्यावर खूप दबाव आहे. खूप दबाव आहे… आम्हाला पाच मिनिटात राणेंना अटक करायला सांगितलं आहे असं एसपीने सांगितलं. पोलीस आम्हाला अटक वॉरंट दाखवत नाहीत. सदर गृहस्थ केंद्रीय मंत्री आहेत. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली पाहिजे. पण एसपी म्हणतात आमच्यावर दबाव आहे. आम्ही त्यांना म्हटलं अटक वॉरंटचा कागद दाखवा आम्ही गाडीत बसून पोलीस स्टेशनला येतो, असं जठार म्हणाले.

हे कायद्याचं राज्य आहे

आम्ही एसपीला विचारलं कुणाचा दबाव आहे. तर तेही पोलीस सांगायला तयार नाहीत. हे कायद्याचं राज्य आहे. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला अटक वॉरंट दाखवा. आम्हाला नाही तर महाराष्ट्राला दाखवा, अशी विनंतीही आम्ही पोलिसांना केली, असं त्यांनी सांगितलं.

केंद्राच्या संपर्कात

आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. तसेच कोर्टातही बेलसाठी अर्ज केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बलात्कारी, वाट्टेल ते धंदे करणाऱ्यांना अटक केली जात नाही. केंद्रीय मंत्र्यांना मात्र अटक करण्याची धडपड करण्यात येत आहे. दबावाने कायदा तयार होत नाही. असा कायदा चालत नाही, असं त्यांनी सांगितलं.

राणेंची प्रकृती बिघडली

दरम्यान, राणे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा बीपी वाढला असून शुगरचा त्रासही सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारी डॉक्टरांचं पथक राणेंच्या निवासस्थानी आलं आहे. राणेंचे डॉक्टरही त्यांची प्रकृती चेक करत आहेत, असं जठार यांनी सांगितलं. (police don’t have arrest warrant against narayan rane, says pramod jathar)

 

संबंधित बातम्या:

राणेंच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये काढला केस पेपर; भाजप कार्यालयावर दगडफेक; भाजप कार्यकर्तेही काठ्या-दंडुके घेऊन रस्त्यावर

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचली असती, आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राणेंना अटक केली तर जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार? फडणवीसांकडून प्लॅन जाहीर

(police don’t have arrest warrant against narayan rane, says pramod jathar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI