AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणेंच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये काढला केस पेपर; भाजप कार्यालयावर दगडफेक; भाजप कार्यकर्तेही काठ्या-दंडुके घेऊन रस्त्यावर

भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. युवा सैनिकांनी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये राणेंच्या नावाने केस पेपर काढला. (Shiv Sena, BJP workers clash in thane over Narayan Rane's 'slap Uddhav' remark)

राणेंच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये काढला केस पेपर; भाजप कार्यालयावर दगडफेक; भाजप कार्यकर्तेही काठ्या-दंडुके घेऊन रस्त्यावर
shivsena protest
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 2:20 PM
Share

ठाणे: भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. युवा सैनिकांनी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये राणेंच्या नावाने केस पेपर काढला. तसेच खोपटमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केल्याने शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. (Shiv Sena, BJP workers clash in thane over Narayan Rane’s ‘slap Uddhav’ remark)

shivsena protest

shivsena protest

शिवसैनिकांनी आज सकाळपासूनच ठाण्यात नारायण राणेंविरोधात एल्गार पुकारला आहे. ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर युवा सेनेने हातात कोंबड्या घेऊन आंदोलन केले. यावेळी राणे यांच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये केस पेपर देखील काढण्यात आला. त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च शिवसेना उचलेल, असा उपरोधिक टोला युवा सेनेने लगावला आहे.

shivsena protest

shivsena protest

भाजप कार्यालय फोडले

तर ठाण्याच्या खोपट येथील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. तसेच शाई आणि फुगेही फेकले. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप आमनेसामने आले. भाजपचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. शिवसैनिक आणि भाजपने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

shivsena protest

shivsena protest

राणेंविरोधात गुन्हा दाखल होणार?

ठाण्यातील नौपाडा येथेही पोलिस ठाण्यात शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती संजय भोईरसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनबाहेर राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

shivsena protest

shivsena protest

नाशिकमध्येही तोडफोड

दरम्यान, जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

सांगलीत शाईफेक

नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलेली असतानाच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Shiv Sena, BJP workers clash in thane over Narayan Rane’s ‘slap Uddhav’ remark)

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे काय?; जयंत पाटलांचा पाटील, फडणवीसांना सवाल

(Shiv Sena, BJP workers clash in thane over Narayan Rane’s ‘slap Uddhav’ remark)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.