Pramod Chaugule : सांगलीतील टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम, प्रमोद चौगुलेचे जल्लोषात स्वागत

| Updated on: May 02, 2022 | 9:30 PM

प्रमोद चौगुले यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले होते. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालय झाले होते. तर प्रमोद चौगुले यांचे वडील बाळासो चौगुले हे ड्रायव्हर होते. तर आई घरी शिवणकाम करते.

Pramod Chaugule : सांगलीतील टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम, प्रमोद चौगुलेचे जल्लोषात स्वागत
सांगलीतील टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले (Pramod Balasaheb Chaugule) यांनी दुसर्‍या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात प्रथम (First) क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या सोनी येथील मूळ गावी त्यांचे कुटुंब पोहचले आणि गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. यावेळी चौगुले कुटुंब भारावून गेले. प्रमोद चौगुले यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले होते. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालय झाले होते. तर प्रमोद चौगुले यांचे वडील बाळासो चौगुले हे ड्रायव्हर होते. तर आई घरी शिवणकाम करते. (Pramod Chowgule son of a tempo driver from Sangli, came first in the state in the MPSC examination)

गावकऱ्यांकडून प्रमोद चौगुलेंचं जंगी स्वागत

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रमोद चौगुले यांनी यश मिळवले आहे. तर प्रमोद चौगुले यांचे मेहुणे प्रसाद चौगुले हे गेल् यावर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालात राज्यात प्रथम आले होते. त्यांचे सध्या पुण्यात उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण सुरु आहे. गेल्या वर्षी मेहुणे तर यावर्षी प्रमोद चौगुले हे राज्यसेवेच्या परिक्षेत राज्यात प्रथम आले. आणि गावात गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. यावेळी चौगुले कुटुंब भारावून गेले.

यशामागे मी एकटा नाही : प्रमोद चौगुले

या यशामागे माझे आई-वडिल, बायको, मित्र परिवार या सर्वांचे योगदान आहे. सोनी गावचे सर्व ग्रामस्थ या सर्वांचा कुठेतरी वाटा आहे. माणूस जेव्हा घडतो तो त्याच्या जीवनाच्या पहिल्या 5-6 वर्षात घडतो. सुरवातीचा काळ मी या गावात काढलेला आहे. त्यामुळे माझ्या यशामध्ये मी या गावात घडलो. मी इथे आल्यानंतर माझं जंगी स्वागत केलंय, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे त्यांनी आपला वेळ माझ्यासाठी दिलंय, अशी प्रतिक्रिया प्रमोद चौगुले यांनी दिली आहे. (Pramod Chowgule son of a tempo driver from Sangli, came first in the state in the MPSC examination)

हे सुद्धा वाचा