‘एक दिवस येतात, 10-15 फोटो काढतात, नंतर रोज कार्यक्रम घेतल्याचे फोटो टाकतात’, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

| Updated on: Jul 12, 2021 | 4:52 AM

"रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात," असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय.

एक दिवस येतात, 10-15 फोटो काढतात, नंतर रोज कार्यक्रम घेतल्याचे फोटो टाकतात, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
राम शिंदे आणि रोहित पवार
Follow us on

अहमदनगर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. “रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात,” असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर टीका केली (Ram Shinde criticize Rohit Pawar for not present in constituency).

राम शिंदे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात.’ ‘जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही,’ असंही त्यांनी नमूद केलं.

“माझं राज्य सरकारला आव्हान, जलसंधारणाच्या कामांची चौकशी कराच”

“मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती. गावात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके चांगली आली. हाच ही कामं योग्य पद्धतीने झाल्याचा पुरावा आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच,’ असंही राम शिंदे यांनी आव्हान दिलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे

मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?

VIDEO: अजित पवारांसोबतच्या खासगी भेटीची राम शिंदेकडून अखेर कबुली, म्हणाले…

Ram Shinde criticize Rohit Pawar for not present in constituency