सकारात्मक बातमी, रत्नागिरीच्या तीन चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात

| Updated on: Jun 29, 2021 | 11:50 AM

महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूमुले पहिला मृत्यू देखील रत्नागिरीत झाला आहे. मात्र, त्याच रत्नागिरी जिल्ह्यातून सकारात्मक बातमी समोर आली आहे.

सकारात्मक बातमी, रत्नागिरीच्या तीन चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात
corona virus
Follow us on

रत्नागिरी: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस वेरियंटचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीमध्ये आढळून आले आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू देखील रत्नागिरीत झाला आहे. मात्र, त्याच रत्नागिरी जिल्ह्यातून सकारात्मक बातमी समोर आली आहे. डेल्टा प्लस वेरियंटवर तीन मुलांनी यशस्वी मात केली आहे. संगमेश्वरमधील तीन मुलांना डेल्टा प्लसचा संसर्ग झालेला. (Ratnagiri Sangameshwar Three children cure from Corona virus Delta Plus Variant)

संगमेश्वरमधील तीन मुलांची डेल्टा प्लसवर मात

राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरमध्ये तीन मुलांना डेल्टा प्लस विषाणूची बाधा झाली होती. तीन वर्ष चार वर्ष आणि सहा वर्षाच्या मुलांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. पण तीन मुलांची डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केलीय.

रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत 2908 बालकांना कोरोना

रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील 2908 बालके कोरोना बाधित झाली होती. एप्रिल पासूनच लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा झाल्याची आकडेवारी समोर येतेय. यात सर्वाधिक बाधित मुले रत्नागिरी तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील 836 मुलांना कोरोना झाला. येथील मुलांना डेल्टा प्लसचा विषाणूचा विळखा पाहायला मिळतोय.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 34 रुग्ण तर देशाची संख्या 66 वर

पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी 14 नव्या केसेस सापडल्या आहेत. डेल्टा प्लसने आतापर्यंत 34 रूग्ण संक्रमित झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत. अशाप्रकारे, देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांती संख्या 66 झाली आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित बातम्या

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

(Ratnagiri Sangameshwar Three children cure from Corona virus Delta Plus Variant)