मनस्ताप देणाऱ्या तहसीलदारांची बदली करा नाहीतर अनुचित प्रकार घडू शकतो, नांदेडच्या तलाठी संघटनेचा इशारा

| Updated on: Aug 13, 2021 | 7:59 AM

माहूर तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी हे तहसीलदारांच्या मनमानीला वैतागले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदार मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मनस्ताप देणाऱ्या तहसीलदारांची बदली करा नाहीतर अनुचित प्रकार घडू शकतो, नांदेडच्या तलाठी संघटनेचा इशारा
Follow us on

नांदेड : माहूर तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी हे तहसीलदारांच्या मनमानीला वैतागले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदार मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

त्यामुळे तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी एकत्र येऊन एक तर आमची बदली करा अन्यथा तहसिलदारांची बदली करा अशी मागणी केलीय. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा तलाठी संघटनेने दिलाय. एखाद्या तहसीलदाराच्या विरोधात सगळ्या तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी अश्या प्रकारची तक्रार करण्याची नांदेडमधील तरी ही पहिलीच वेळ आहे.

तलाठी संघटनेचं म्हणणं काय आहे…?

मागील एक महिन्यापासून काही राजकीय लोकांकडे त्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या, त्यामुळे तहसीलदार एस. वरणगावकर यांनी गैरसमजातून त्याबाबतचा राग मनामध्ये धरुन आम्ही तलाठी आणि मंडल अधिकारी यांना मानसिक त्रास देणं सुरु आहे. त्यांची भाषा खूपच अर्वाच्य झाली असून ते महिला तहसीलदारांनाही त्याच भाषेत बोलत असतात. त्यांचे धमकी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे सर्व तलाठी व मंडल अधिकारी दडपणाखाली असून अनुचित प्रकार घडू शकतो. आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असं तलाठी संघटनेचं म्हणणं आहे.

माहुर तालुक्याचे तहसीलदार वरणगावकर यांची बदली करावी, किंवा आम्ही सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची बदली इतरत्र करावी. आम्हा सर्व तलाठ्यांवर द्वेषभावनाने कार्यवाही करु नये, असं तलाठी संघटनेने म्हटलं आहे.

(Replace the tehsildar of Mahur Demand Talathi Association mahur Nanded Maharashtra)

हे ही वाचा :

बीडीडीचे रहिवाशी म्हणतात 800 चौ. फुटाचं घर द्या, आव्हाड म्हणाले, तुमचं नशीब चांगलंय, मागणी पूर्ण होणार?

‘जमीन खरेदीचा प्रस्ताव दिला, पण जागा मालकांचा फारसा प्रतिसाद नाही, रस्त्यासाठी आता थेट सक्तीने भूसंपादन करणार’

साताऱ्यासह महाराष्ट्राला पुन्हा डॉ. डेथची का आठवण? नेमकं काय केलं होतं डॉ. संतोष पोळनं?