AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडीडीचे रहिवाशी म्हणतात 800 चौ. फुटाचं घर द्या, आव्हाड म्हणाले, तुमचं नशीब चांगलंय, मागणी पूर्ण होणार?

नायगाव बीडीडी चाळीत 1 जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना 500 चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

बीडीडीचे रहिवाशी म्हणतात 800 चौ. फुटाचं घर द्या, आव्हाड म्हणाले, तुमचं नशीब चांगलंय, मागणी पूर्ण होणार?
Jitendra Awhad
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 11:12 PM
Share

मुंबई : नायगाव बीडीडी चाळीत 1 जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. त्यांना 500 चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार असून शासन कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी आज नायगाव येथील ललित कला भवन येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. (BDD chawl residents demands 800 square feet houses to Jitendra Awhad)

यावेळी बीडीडी चाळींमधील रहिवाशांनी 800 चौरस फुटांच्या घरांची मागणी केली. यावेळी आव्हाड म्हणाले की, तुमचं नशीब चांगलं आहे. नाहीतर अनेकांना मुंबईबाहेर जावं लागलं आहे. मागण्यांना मर्यादा नाही, जे जमणार नाही ते मागायचं नाही. पोलीस विभागाकडून जीआर येईल. 2900 घरं त्यात येतात. हे देऊनही पोलिसांनादेखील वेगळी घरं द्यायची आहेत. मीदेखील चाळीतून आलोय. सर्व बघून आलोय

आव्हाड म्हणाले की, या चाळीतील महिलांना जे प्रश्न भेडसावतात त्यामुळे मी हे करतोय. काय बदल हवेत योग्य वाटल्यास ते होतील. मी ज्या पद्धतीने पळतोय त्या पद्धतीने फाईल पळतील हे मी सांगू शकत नाही. आत्ता जे रहिवासी येथे राहात आहेत त्या सर्वांना घर मिळणार आहे. आम्हाला कोर्टाची पायरी चढायची नाही हीच तुमच्याकडून आपेक्षा आहे, अशी रहिवाशांची मागणी आहे. आधीच्या सरकारने बसून प्रश्न सोडवायला हवे होते. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासी 10 मिनिट चर्चाकरून निर्णय घेतला. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असे आवाहन डॉ. आव्हाड यांनी यावेळी केले.

दहा दिवसात काम सुरू, सुरुवातीला 400 लोकांचं स्थलांतर

पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असून सुमारे 400 लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना शासनातर्फे 22 हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल. या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन शासन निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येतील. पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील आठ दिवसात त्याचाही शासन निर्णय काढण्यात येईल असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

देखभाल दुरुस्तीचा समावेश करारात करणार

इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प

बीडीडी चाळींचा पुनर्वसन प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प असून हे महाराष्ट्राला गौरवास्पद आहे असेही आव्हाड यांनी सांगितले. यावेळी डॉ.आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांच्याशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले. त्यांनी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सदनिकेच्या प्रतिकृतीची पाहणीही डॉ. आव्हाड यांनी केली.

नायगाव बीडीडी चाळीमध्ये 41 इमारती असून 3 हजार 344 सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर व राजू वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी योगेश म्हसे, स्थानिक नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशी व म्हाडाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

Explainer: SEBC आरक्षणामुळे आरक्षणाची सिस्टीमच बदलणार? OBC, एससी, एसटीचा कोटा कमी होणार का? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचं आवाहन

(BDD chawl residents demands 800 square feet houses to Jitendra Awhad)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.