Saibaba Donation : शिर्डीत साईबाबांच्या चरणी चक्क 5 हजार किलो केशर आंब्यांचे दान, भाविकांना मिळाली आमरसाची पर्वणी

| Updated on: Jun 16, 2022 | 8:53 PM

साईभक्‍त दिपक करगळ यांची स्‍वतःच्या मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षापासून साईभक्‍त करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्‍वरुपात देत आहेत.

Saibaba Donation : शिर्डीत साईबाबांच्या चरणी चक्क 5 हजार किलो केशर आंब्यांचे दान, भाविकांना मिळाली आमरसाची पर्वणी
शिर्डीत साईबाबांच्या चरणी चक्क 5 हजार किलो केशर आंब्यांचे दान
Image Credit source: TV9
Follow us on

शिर्डी : देश-विदेशातील साईभक्त साई चरणी सोने, चांदी, रुपये अशा विविध स्वरूपात दान देत असतात. मात्र एका साईभक्ताने चक्क 5 हजार किलो केशर आंबे (Kesar Mango) साई संस्थानला दान (Donate) स्वरूपात दिले आहेत. दोन दिवस साईबाबा संस्थानच्या प्रसादालायात येणाऱ्या भाविकांना तसेच संस्थानच्या रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आमरसा (Amras)ची मेजवानी मिळणार आहे. शिर्डीसह पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदी धार्मिक स्थळी सदर भाविकाने केशर आंब्याचे दान दिलं आहे. पुणे जिल्‍ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्‍त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्‍दतीने पिकविलेले 5 हजार किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साई प्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

देणगी स्वरुपात साई भक्ताकडून केशर आंबे

साईभक्‍त दिपक करगळ यांची स्‍वतःच्या मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षापासून साईभक्‍त करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्‍वरुपात देत आहेत. यावर्षी सुमारे 4 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 5 हजार किलो केशर आंबे देणगी स्‍वरुपात संस्‍थानच्‍या श्री साई प्रसादालयात दिलेले आहेत. दोन दिवस या आंब्‍यांच्‍या रसाचे प्रसाद भोजन साईभक्‍तांना, दोन्‍ही रुग्‍णालय येथील रुग्‍णांना तसेच अनाथाश्रम, वृध्‍दाश्रम आदी ठिकाणी देण्‍यात येणार असल्‍याचे बानायत यांनी सांगितले. (Sai devotees donated 5,000 kg of saffron mangoes to Sai Baba in Shirdi)

हे सुद्धा वाचा